आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:'पंतप्रधानांचे वक्तव्य देशाच्या परंपरेला शोभणारे नाही; रामजन्मभूमी, रथयात्रा हे आंदोलन नव्हते का?'- संजय राऊत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरेंद्र मोदींनी पुढे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी

आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलकांची एक टोळी सक्रीय असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. 'पंतप्रधानांचे वक्तव्य देशाच्या परंपरेला शोभणारे नाही. रामजन्मभूमी, रथयात्रा हे आंदोलन नव्हतं का?' असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'आंदोलनाचे खच्चीकरण करणे देशाच्या परंपरेला शोभणारे नाही. भाजपही आंदोलन करूनच पुढे आलेला पक्ष आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करूनच भाजप पुढे आला आहे. भाजपच्या सायबर फौजांनी बदनामी आंदोलन उभारले, म्हणूनच भाजपला सुगीचे दिवस आले. भाजपचे राम जन्मभूमी आंदोलन, रथयात्रा, भारत जोडो, काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम हे आंदोलन नव्हते काय? तुम्हीच केलेल्या राष्ट्रीय आंदोलनाची तुम्हीच तुमच्या वक्तव्यातून बदनामी झाली आहे', असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.

मोदींनी पुढे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी

यावेळी संजय राऊत यांनी मोदींनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केले. शरद पवारांनी घुमजाव केलाच नाही. त्यांची भूमिका योग्यच आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून पंतप्रधानांनीच एक पाऊल पुढे यायला हवं. शेतकरी अज्ञानी आहे, त्याच्या मनात भीती आहे. शेती, पीक हेच त्याचे जग आहे. त्यामुळे पंतप्रधांनी केवळ आवाहन करू नये. एक पाऊल पुढे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी. यामुळे पंतप्रधानांची ऊंची कमी होणार नाही, उलट त्यांची ऊंची वाढेल', असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...