आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Raut Is A Liar! Sushant's Father Did Not Get Married Twice, Sanjay Raut's Allegation Denied By Sushant Family

सुशांत आत्महत्या प्रकरण:संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत, संजय राउत यांच्या आरोपाचे सुशांतच्या कुटुंबियांकडून खंडन

पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज होता असा आरोप संजय राउत यांनी केला होता

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव आल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊतही या मैदानात उतरले आहेत. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज होता असा दावा राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात केला होता. सुशांतच्या कुटुंबियांनी या आरोपाचे खंडन केले असून संजय राऊत खोटे बोलत आहेत, असा आरोप सुशांतच्या मामाने केला आहे.

सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी सामनामधून केला होता. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत, असे सुशांतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितले. बिहारमध्ये जे राहतात त्या सगळ्यांना माहितीये की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केले आहे, असंही सिंग म्हणाले.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचे वक्तव्य केले आहे. राऊत असे वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. असे काहीतरी बोलून एखाद्याची प्रतिमा मलिन करणे ही चांगली बाब आहे का? असा सवालही सिंग यांनी विचारला.

बातम्या आणखी आहेत...