आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Raut | Shiv Sena Dasra Meet | No Online Dasra Melawa For Shiv Sena This Year, Says Sanjay Raut Latest News And Updates

आवाज कुणाचा:यंदा ऑनलाइन नाही तर प्रत्यक्ष होणार शिवसेनेचा दसरा मेळावा, संजय राऊत यांचे मोठे विधान; पवारांच्या प्रतिक्रियेचेही केले समर्थन

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात सर्वत्र जाहीर कार्यक्रम आणि सोहळे टाळले जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन नाही तर प्रत्यक्ष दसरा मेळावा होणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक होत असल्याने शिवसेनेने दसरा मेळाव्याचे ऑनलाइन आयोजन केले होते.

मुख्यमंत्री निर्णय घेतील
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दसरा मेळाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर बोलताना यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन होणार आहे. यामध्ये कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन केले जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबत निर्णय घेणार आहेत असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने कारखाली चिरडले. त्या घटनेच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. शरद पवारांनी या घटनेची तुलना थेट ब्रिटिश काळातील जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली. याबाबत प्रश्न विचारला असताना संजय राऊत यांनी पवारांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

अग्रलेखातूनही साधला निशाणा
शिवसेनेने लखीमपूर घटनेबद्दल आपल्या मुखपत्रातून निषेध व्यक्त केला. मुखपत्रातील अग्रलेखात लिहिले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा अमृत महोत्सव साजरा करायला लखनौला गेले. पण, अमृत महोत्सव रक्ताने माखला आहे. त्यामुळे याला स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

सामना अग्रलेखात पुढे लिहिले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. कायदे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटवले हे विसरायला नको. प्रियंका गांधी यांची लढाई ही शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो एक भ्रम आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्या फुटल्याशिवाय राहाणार नाही. देशाचे खासगीकरण सुरू झाले आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!"

बातम्या आणखी आहेत...