आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांची प्रतिक्रिया:पंतप्रधान शेतकऱ्यांवर प्रेम करतात, तर त्यांनी या विषयावर बोलावे; लखीमपूर हिंसाचारावर राऊतांची प्रतिक्रिया; आज घेणार राहूल गांधी यांची भेट

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागायला हवी.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचार आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ही राजकारणाची बाब नाही, पण सरकारने शेतकऱ्यांना का मारले याचा खुलासा करावा. ते म्हणाले की, जर पीएम मोदी शेतकऱ्यांवर प्रेम करतात, तर त्यांनी या विषयावर बोलायला हवे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'हरियाणात शेतकऱ्यांवर हल्ले झाले. त्यानंतर लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना मारुन टाकण्यात आले. जर तुम्ही (पंतप्रधान मोदी) शेतकऱ्यांवर प्रेम करत असाल तर बोलायला हवे. पुढे बोलताना ते म्हणाले की, लखीमपूर खेरीमध्ये जे घडले त्यामुळे संपूर्ण जग दुखावले आहे. तसेच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? येथे शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागायलाच हवी. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. मात्र शेतकरी, जनता लढत राहतील' असेही राऊत म्हणाले.

प्रियंका गांधींच्या अटकेवर म्हणाले...
प्रियंका गांधी यांच्या अटकेवर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'प्रियंका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, तुमचे वैर काँग्रेससोबत देखील असू शकते, मात्र त्यांचा गुन्हा काय आहे. त्यांना कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले आहे? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले आहेत ते आदेशाप्रमाणेच होते. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राऊत घेणार राहुल गांधींची भेट
लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दुपारी सव्वा चार वाजता ही भेट होणार अशी माहिती आहे. यापूर्वीही संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीची देखील चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर आज राऊत आणि राहुल गांधी यांची भेट होईल.

बातम्या आणखी आहेत...