आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Singh AAP Party MP House Attack Case Update Rajyasabha MP On BJP Over Ram Mandir Donation; News And Live Updates

आप खासदाराच्या घरावर हल्ला:संजय सिंह यांच्या दिल्ली येथील घराची तोडफोड, सिंह यांनी या हल्ल्याला राम मंदिर जमिनीच्या घोटाळ्याशी जोडले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण प्रकरण काय आहे?

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या दिल्ली येथील घरी अज्ञात लोकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, सिंह यांनी या हल्ला राम मंदिर जमिनीच्या घोटाळ्याशी जोडला असल्याचा आरोप केला आहे. खासदार संजय सिंह यांनी काही दिवसापूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवरुन या घोटाळ्यासंदर्भांत माहिती दिली होती. ज्यामध्ये त्यांनी 2 कोटी रुपयांची जमीन पाच मिनटांत 18.50 कोटी रुपयांची कशी झाली याबाबत विचारणा केली होती. संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीदेखील केली होती.

आप खासदार म्हणाले - मी घाबरत नाही
'मी कोणाला घाबरत नसून भगवान श्री राम यांच्या नावावर होणार्‍या घोटाळ्याला उघडकीस असल्याचे सिंह मंगळवारी म्हणाले.' संजय सिंह यांच्या घरी झालेल्या हल्ल्यात फक्त नेम प्लेट तोडण्याचा प्रयत्न केला गेला असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचे दिल्ली पोलिस उपायुक्त दीपक यादव म्हणाले. संबंधित प्रकरणात दोन जणाला अटक करण्यात आली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

  • अयोद्धा येथे होणार्‍या राम मंदिर जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आण‍ि माजी मंत्री पवन पांडे यांनी केला होता.
  • त्यांनी सोशल मीडियावर याचे काही पुरावे सादर करत 2 कोटी रुपयांची जमीन 10 मिनटांत 18.50 कोटी रुपयांची कशी झाली याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, त्यांनी संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीदेखील पांडे यांनी केली होती.
  • याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आण‍ि आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला होता. परंतु, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
बातम्या आणखी आहेत...