आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) गंभीर आरोप केले आहेत. ते बुधवारी म्हणाले की, ईडीचे अधिकारी थर्ड डिग्री टॉर्चर करून लोकांना जबाब लिहिण्यास भाग पाडत आहेत. ईडीने चंदन रेड्डी नावाच्या व्यक्तीला इतकी मारहाण केली की त्याच्या कानाचा पडदा फाटला. संजय सिंह यांनी रेड्डी यांचा वैद्यकीय अहवालही दाखवला.
चंदन रेड्डी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावली, ज्याची मला माहिती नव्हती, ज्या तथ्यांची मला माहिती नव्हती. सही न केल्यामुळे त्यांनी मला एवढी मारहाण केली की माझ्या कानाचा पडदा फाटला.
चंदन रेड्डी यांनी आपल्या याचिकेत म्हटले की- काही लोक होते जे ईडीचे अधिकारी नव्हते आणि त्यांनी मारहाण केली. ईडी कार्यालयात मारहाण करून जबरदस्तीने स्टेटमेंट लिहून घेतात, ते गुंड कोण आहेत असा सवाल संजय सिंह यांनी केला. याचा खुलासा झाला पाहिजे असे ते म्हणाले.
ईडी ही एन्फोर्समेन्ट डिक्टेटरशिप बनली आहे
संजय सिंह म्हणाले- ईडी आता अएन्फोर्समेन्ट डिक्टेटरशिप बनली आहे. ईडी दबावाखाली, थर्ड डिग्री टॉर्चर करून खोटे जबाब घेत आहे. चंदन रेड्डी व्यतिरिक्त ईडीने अरुण पिल्लई, समीर महेंद्रू, भूषण बेळगावी, मानसामी प्रभुणे, राघव रेड्डी यांनाही त्रास दिला आहे. आमचा व आमच्या कुटुंबाचा छळ करून जबाब घेण्यात आला व लिहून घेण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले आहे.
सिसोदिया यांच्या पीएसलाही त्रास देण्यात आला
मनीष सिसोदिया यांचा पीएस रिंकूला सतत त्रास दिला जात असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे. याचे उत्तर मी संसदेतही देईन, ईडीच्या अधिकाऱ्यांना बोलवावे. ते लोकांना कसे मारत आहेत? ते कायद्याच्या वर आहेत का? असेही संजय सिंह म्हणाले.
मुलींच्या नावे धमक्या
मुलींच्या नावाची धमकी देऊन लोकांना सह्या करायला लावल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तुमची मुलगी कॉलेजमध्ये कशी जाईल ते आम्ही बघू, असे एका व्यक्तीला धमकावण्यात आले. अरुण पिल्लई यांच्या पत्नी, मुलीला धमकावण्यात आले. समीर महेंद्रू यांनी न्यायालयात सांगितले की, त्यांचा जबाब बळजबरीने घेण्यात आला. हे सर्व जबाब केवळ अबकारी प्रकरणात घेण्यात आले होते. ज्याला घोटाळा म्हटले जात आहे.
संजय सिंह म्हणाले- बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देणारे हे लोक आहेत. दिल्ली अबकारी घोटाळा नसून हिटलरच्या गॅस चेंबरमध्ये ईडीच्या बंदुकीच्या जोरावर जबाब घेतले जात असल्याचे यावरून सिद्ध होते, असा दावा त्यांनी केला. एकंदरीत खोटी आणि बिनबुडाची केस करत आहे. खोट्या आधारावर केस कशी करू शकता. खोटी विधाने करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असेही संजय सिंह म्हणाले.
ईडीने आपच्या दोन नेत्यांना अटक केली आहे
मनीष सिसोदिया तिहार तुरुंगात
मनीष सिसोदिया हे मद्य धोरण प्रकरणातील आरोपी आहेत. ते सध्या तिहारमध्ये आहेत. त्यांनी जामिनासाठी राऊस अॅव्हेन्यू कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात दाद मागितली आहे. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
आप नेते सत्येंद्र जैन यांनाही ईडीने अटक केली होती
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ED ने 30 मे 2022 रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. जैन, त्यांची पत्नी पूनम आणि इतरांवर बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन यांनी दिल्लीत अनेक शेल कंपन्या तयार केल्या किंवा विकत घेतल्याचा आरोप आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.