आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनादरम्यान आत्महत्या:संत राम सिंह यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान केली आत्महत्या

पानीपत7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम सिंह यांनी स्वतःवर झाडली गोळी

शेतकरी आंदोलनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलनाच्या समर्थनार्थ 65 वर्षीय संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली आहे. ते करनालच्या सिंघरा गावातील रहिवासी होते. तसेच, ते सिंघराच्या गुरुद्वारा साहिब नानकसरचे ग्रंथी होते. त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोंमध्ये आहे.

संत राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या सोबत असलेल्या गुरमीत यांनी सांगितले की, राम सिंह यांनी आम्हाला म्हटले की, तुम्ही स्टेजवर जाऊन अरदास करा. मी स्टेजवर गेलो, तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पंजाबी भाषेत एक सुसाइड नोट लिहीली आहे. यात त्यांनी लिहीले की, 'आत्याचाराविरोधात हा आवाज आहे.' दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंध कमेटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी त्यांच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केले आहे.

कोंडली बॉर्डरवर आंदोलनादरम्यान आत्महत्या

संत राम सिंह यांनी कोंडली बॉर्डरवर आत्महत्या केली. येथे उपस्थित लोकांनी त्यांना पानीपतच्या पॉर्क हॉस्पीटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...