आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत समाज शनिवारी 4 जून रोजी भगवान आदि विश्वेश्वरांची पुजाअर्चा करण्यासाठी ज्ञानवापीत जातील. वाराणसीच्या केदार घाट स्थित विद्या मठाचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी गुरूवारी ही घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे पोलिसांपुढे कायदा सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. तूर्त, अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करणे टाळले आहे.
काही दिवसांपूर्वीच ज्योतिष व द्वारिका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराजांनी एक मोठे विधान केले होते. ते म्हणाले होते की, ज्ञानवापीत प्रकट झालेल्या भगवान आदि विश्वेशरांची आराधना सुरू करा.
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती सनातन धर्माचे सर्वात मोठे आचार्य आहेत. याशिवाय धर्माच्या दृष्टिकोनातून काशी उत्तर क्षेत्रात येते. शंकराचार्य महाराज याच उत्तर क्षेत्रातील मुख्य धर्मगुरू आहेत. यामुळे त्यांच्या आदेशांनंतर संत समाजात उल्हासाचे वातावरण पसरले आहे.
महादेवाला न ओळखणारे मूर्तीला कारंजाच म्हणतील
स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले -शंकराचार्य महाराज सध्या मध्य प्रदेशात आहेत. त्यांच्या सेवेसाठी आतापर्यंत मी तिथे होतो. त्यांच्या आदेशानुसार आता वाराणसीत आलो आहे. ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग आढळले किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, अद्याप कुणी ते शिवलिंग नसल्याचेही कुणी फेटाळले नाही.
ते पुढे म्हणाले -'एक पक्ष शिवलिंग म्हणत आहे. दुसरा पक्ष कारंजा असल्याचा दावा करत आहे. याचा अर्थ दोन्ही पक्षकार एकच युक्तिवाद करत आहेत. सनातन धर्मात एकच देवता आहे, ज्याच्या जटांतून पाणी निघते, ते म्हणजे शिव. ज्या व्यक्तीला शिव माहिती नाहीत, त्यांचे कथानक माहिती नाही, त्यांचा महिमा माहिती नाही, ते त्यांच्या मूर्तीला कारंजेच म्हणतील.'
आता आपल्या डोळ्यांपुढे महादेव प्रकट झालेत. त्यांची पूजा व सेवा करणे आमचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. असे केले नाही तर आपण पापाचे वाटेकरू होऊ. त्यामुळे धर्म व शास्त्राच्या मार्गावर चालत आम्ही आमच्या गुरूंच्या आदेशांनुसार भगवान आदि विश्वेश्वरांची नियमित पूजाअर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. कोर्टाचा सन्मान राखण्यासाठी आम्ही 4 तारखेची वाट पाहत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.