आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रसिद्ध संतूर वादक काळाच्या पडद्याआड:पंडित भजन सोपोरी यांचे निधन, शास्त्रीय संगीताचे 3 राग रचले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रसिद्ध संतूर वादक पद्मश्री पंडित भजन सोपोरी यांचे गुरुवारी गुरुग्राममधील एका रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. सोपोरी यांचा जन्म 1948 साली श्रीनगरमध्ये झाला. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 1992 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2004 मध्ये केंद्राने त्यांचा पद्मश्रीने गौरव केला.

पंडित भजन सोपोरी यांनी भारतासह अनेक देशांत आपले कार्यक्रम सादर केले होते.
पंडित भजन सोपोरी यांनी भारतासह अनेक देशांत आपले कार्यक्रम सादर केले होते.

संगीताचे शिक्षण वारशाने मिळाले

भजन सोपोरी यांना संतूर वादनाचे शिक्षण वारशाने मिळाले होते. त्यांचे आजोबा एस.सी. सोपोरी व वडील पंडित एस. एन. सोपोरीही संतूर वादक होते. त्यामुळे त्यांना घरातच संतूरचे धडे मिळाले. भजन संतूरसह गायनातही निपुण होते. त्यांनीसंगीतासह इंग्रजी साहित्यातही पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर वॉशिंग्टन विद्यापीठातून वेस्टर्न क्लासिकल म्यूझिकचे शिक्षण घेतले. त्यांनी तीन रागांची रचना केली आहे. यात राग लालेश्वरी, राग पटवंती व राग निर्मल रंजनीचा समावेश आहे.

पंडित भजन सोपोरींचा संबंध सूफियाना घराण्याशी आहे. त्यांनी नट योग ऑन संतूर नामक अल्बमही तयार केला होता. ते सोपोरी संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्स अकादमीचे संस्थापक देखील आहेत. या अकादमीचा मुख्य उद्देश शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्याचा आहे.

चार हजारांहून अधिक गाण्यांना संगीत

पंडित सोपोरी हे भारतातील एकमेव शास्त्रीय संगीतकार आहेत ज्यांनी संस्कृत, अरबीसह देशातील जवळपास प्रत्येक भाषेत चार हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. त्यांनी देशाच्या ऐक्यासाठीही अनेक गाणी कंपोज केली. यात सरफरोशी की तमन्ना, कदम-कदम बढाए जा, विजयी विश्व तिरंगा प्यारा व हम होंगे कामयाब आदी सुप्रसिद्ध गाण्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...