आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saputara Ghat Marg Opened After 199 Days, Dang District Administration Announced

घोषणा:सापुतारा घाटमार्ग 199 दिवसांनी  खुला, डांग जिल्हा प्रशासनाने केली घोषणा

बोरगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सापुतारा परिसरातील माळेगाव घाट बुधवारपासून (२५ जानेवारी) अवजड वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. तशी घोषणा डांग जिल्हा प्रशासनाने केली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात दरड कोसळल्याने घाटातील रस्ता खराब झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता आठ दिवस बंद करण्यात आला होता. त्यानंतर छोट्या वाहनांसाठी जरी रस्ता सुरू केला असला, तरी अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात शासनाने तब्बल १९९ दिवसात रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून अवजड वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.

माळेगाव-सापुतारा घाटमार्गाने सापुताऱ्याहून महाराष्ट्राच्या दिशेने जाणारी अवजड वाहने, एसटी, टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स बस, मालवाहू ट्रक यांना फायदा होणार आहे.

मोठ्या त्रासातून सुटका होणार
^सुरतला भाजीपाला नेण्यासाठी सापुतारा मार्ग सोयीचा आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती. त्यामुळे सुरगाणा, उंबरठाण असा ५० किमी जादा फेरा वाचेल. या त्रासातून सुटका होणार आहे.
- काळू पिठे, वाहनचालक, हतगड

बातम्या आणखी आहेत...