आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saren In Jharkhand's Picnic Politics; Entered The Resort With MLAs | Marathi News

आमदारांची बैठक:झारखंडच्या पिकनिक पॉलिटिक्समध्ये साेरेन ; आमदारांना घेऊन रिसॉर्टमध्ये दाखल

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजभवनाचा निर्णय न आल्यामुळे झारखंडच्या राजकारणातील चित्र अद्याप स्पष्ट नाही. निवडणूक आयोगाने खाण लीज प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दोषी मानत आमदारकी रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यपालांनी तीन दिवसांनंतरही आदेश बजावला नाही. सूत्रांनुसार, आदेश सोमवारच्या आधी पाठवला जाणार नाही. राजभवनाचा आदेश मिळाल्यानंतरच आयोग अधिसूचना जारी करेल. यादरम्यान, राजभवनातून विलंब होत असल्याने यूपीएने धोरण बदलून पिकनिक पॉलिटिक्स सुरू केले आहे. शनिवारी सकाळी ११.०० वाजेपासून झामुमो, काँग्रेस आणि राजदचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचू लागले. सर्वांनी गाड्यांत बॅगाही आणल्या होत्या. यानंतर आमदारांना छत्तीसगडला पाठवण्याची शक्यता वर्तवली गेली. दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार तीन बसमधून खुंटीच्या लतरातू धरणाकडे रवाना झाले. आमदार डुमरगडी गेस्ट हाऊसमध्ये थांबले आणि सायंकाळी उशिरा परत आले. यानंतर रात्री काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडेय यांच्यासोबत यूपीए आमदारांची बैठक झाली.

बातम्या आणखी आहेत...