आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sarogate Data Updates: Women unmarried Young Women In Gujarat Now Choose The Path Of Surrogacy In Corona Lockdown; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:कोरोनात रोजगार गेला, गुजरातमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या महिला-अविवाहित तरुणींनी आता निवडला सरोगसीचा मार्ग

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोकऱ्या गेल्याने अनेक महिला अडचणीत, सरोगसीसाठी 3 ते 4 लाख रुपये मिळत आहेत

पूर्व अहमदाबादमध्ये एक २३ वर्षीय युवती घरोघरी विविध कामे करण्यासाठी जात होती, पण हे काम बंद झाल्याने तिच्यासमोर आपले घर चालवण्याची समस्या निर्माण झाली. कोणीतरी तिला सरोगेट आई होण्याचा सल्ला दिला. तिला हा मार्ग बरा वाटला. आता ती एका दांपत्याच्या मुलाची सरोगेट आई होत आहे. कोरोनामुळे नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे महिलांनी नाइलाजाने सरोगसीचा मार्ग निवडला आहे. गुजरातमध्ये अशी २०-२५ प्रकरणे समोर आली आहेत. हैराण करणारी बाब म्हणजे यापैकी काही अविवाहित युवती आहेत. त्यांना त्या बदल्यात ३ ते ४ लाख रुपये आणि वैद्यकीय खर्च मिळतो. त्यांची कथा त्यांच्याच शब्दांत...

पतीची नाेकरी गेली, घरातील सर्व वस्तू विकाव्या लागल्या
आमदार जी. एस. सोलंकी यांनी सांगितले, कोरोना आल्यानंतर काही दिवसातच रेखा नावाच्या महिलेच्या नवऱ्याची नोकरी गेली होती. घर चालवताना तिला अनेक अडचणी येत होत्या. घर खर्चासाठी घरातील सर्व वस्तू विकाव्या लागल्या. उसनवारही कोणी देत नव्हते. मात्र, वस्तू विकूनही जास्त दिवस भागले नाही. मग रेखाने गर्भाशय भाड्याने देण्याचा पर्याय पतीला सुचवला. कोणताच मार्ग नसल्याचे पाहून पतीनेही रेखाला सरोगेट आई होण्यासाठी परवानगी दिली. (सर्व महिलांची नावे बदलण्यात आली आहेत)

नोकरी गेली, टिफिनचे काम सुरू केले, तेही बंद झाले
अॅडव्होकेट अशोक परमार यांनी सांगितले की, माझी परिचित असलेल्या राजश्रीच्या पतीचे निधन झाले. कुटुंबाचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले. मुलांसाठी तिला नोकरी करावी लागली. नंतर ती नोकरी सोडावी लागली. त्यानंतर टिफिनचे काम सुरू केले. लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले. तेव्हा एका महिलेने तिला सरोगेट आई होण्याचा प्रस्ताव दिला. मुलांचे भवितव्य लक्षात घेत राजश्रीने प्रस्ताव स्वीकारला. सध्या तिला घर चालवण्याएवढे पैसे मिळाले आहेत. बाकी रक्कम तिला प्रसूतीनंतर दिली जाईल.

वडिलांनी आई व मला सोडले; नोकरी गेली, हाच पर्याय होता
माझे नाव रिमा. वय २३ वर्षे. लग्न झालेले नाही. वडिलांनी आईला आणि मला सोडून देत दुसरे लग्न केले. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. लोकांच्या घरी काम करून आईने मला वाढवले. मीही नोकरी करून हातभार लावत होते. कोरोनात नोकरी सुटली. आईचे कामही बंद झाले. उत्पन्न थांबले. घरभाडे वाढतच होते. घरमालकही तगादा लावत होता त्यामुळे सरोगेट आई होण्याचा निर्णय घेतला. सरोगसीद्वारे अपत्यप्राप्तीसाठी इच्छुक दांपत्याशी डॉक्टरमार्फत संपर्क झाला. त्यांनी काही पैसेही दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...