आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपग्रहात इंधन म्हणून पाण्याचा वापर होत असलेल्या एका प्रकल्पावर अमेरिकी अंतराळ संस्था नासा काम करत आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी बुटाच्या खोक्याच्या आकाराच्या लहान उपग्रहाची यशस्वी चाचणी केली आहे. त्यात इंधनासाठी पाणी वापरले जाते. नासाच्या या पाथफायंडर टेक्नाॅलॉजी डेमॉन्सट्रेटरचे (पीटीडी-१) प्रकल्प व्यवस्थापक डेव्हिड मायर यांनी भास्करला याबाबत सविस्तर सांगितले-
पाण्याचे इंधनात रूपांतर करून कसा उडतो उपग्रह?
मोठ्या उपग्रहात क्यूबसॅट डिस्पेन्सर बसवले जाते. ते क्यूबसॅटला लाँच करते. सध्याच्या प्रकल्पात त्याचा आकार मोठ्या बुटाच्या खोक्याएवढा (१०X१०X१० सेंटिमीटर) आहे. लाँच होताच त्याचे पंख उघडतात, त्यांच्यावर सोलर पॅनल आहेत. इंधन म्हणून त्यात अर्धा लिटर पाणी असते. सौरऊर्जेद्वारे पाण्यात इलेक्ट्रोलायसिस करून मॉलिक्यूलला एक हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये तोडले जाते. ज्वलनशील असल्याने हायड्रोजन, ऑक्सिजन दोन्ही चांगली इंधने आहेत. ते स्वच्छ, सुरक्षित व खूप स्वस्तही आहे.
पीडीटी प्रकल्प काय आहे?
सॅटेलाइट ट्रॅफिक खूप वाढली आहे. चुकीने त्यांची धडक झाली तर स्फोट व विषारी इंधनामुळे अंतराळ प्रदूषित होऊ शकते. ते टाळण्यासाठी सर्व काळजी घ्यावी लागते. यामुळे अंतराळ मोहिमेचा खर्च वाढतो. म्हणून अशा लहान उपग्रहांची गरज आहे, जे एकाच वेळी अनेक उपग्रह एकाच उड्डाणात पाठवले जाऊ शकतील. तसेच पाण्यासारख्या इंधनाने चालू शकतील. या वर्षी जानेवारीत हा प्रकल्प लाँच झाला, तो यशस्वी झाला. तो क्यूबसारखा असल्याने त्याला क्यूबॅट म्हणतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.