आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 ऑगस्टचा दिवस सतीश कौशिक केव्हाच विसरले नाही:जाणून घ्या काय घडले होते 1979 च्या त्या दिवशी, स्वतःच दिली होती माहिती

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांनी आयुष्यातून अचानक एक्झीट घेतली आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत दुःखाची लाट उसळली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. 'मिस्टर इंडिया'तील कॅलेंडरच्या भूमिकेने बॉलिवूडवर आपली अमिट छाप उमटवणाऱ्या सतीश कौशिक यांच्यासाठी 10 ऑगस्टचा दिवस खूप महत्त्वाचा होता. हो, 10 ऑगस्टचा दिवस. त्यांनी स्वतःच 2020 मध्ये सोशल मीडियावर ही गोष्ट सांगितली होती. चला तर मग पाहूया अखेर हा दिवस सतीश कौशिक यांच्यासाठी का महत्त्वाचा होता.

ट्विटद्वारे सांगितले होते 10 ऑगस्टचे महत्त्व

सतीश कौशिक यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी एक फोटोही शेअर केला होता. त्यात ते म्हणाले होते, 'मी हिरो बनण्यासाठी 9 ऑगस्ट 1079 रोजी पश्चिम एक्सप्रेसने मुंबईला आलो. 10 ऑगस्ट रोजी मुंबईतील माझी पहिली सकाळ होती. मुंबईने मला मित्र दिले, काम दिले, पत्नी दिली, मुले दिली, घर दिले, प्रेम दिले, संघर्षही झाला, यशही मिळाले. अपयशही हाती लागले. पण आनंदाने जगण्याचे बळही दिले. गुड मॉर्निंग मुंबई व मला माझ्या स्वप्नांहून जास्त खूप काही देणाऱ्या सर्वांचे आभार...' अशा प्रकारे कौशिक यांनी आपला तो फोटो शेअर केला होता. त्यात ते एका रेल्वे स्टेशनवर दिसून येत होते.

100 हून अधिक चित्रपटांत अभिनय

सतीश कौशिक यांचा जन्म 3 एप्रिल 1956 रोजी हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये झाला. दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने भी दो यारों' चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली. सतीश कौशिक यांनी 100 हून जास्त चित्रपटांत काम केले. 1993 मध्ये 'रूप की रानी, चोरों का राजा' द्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या नव्या डावाला सुरुवात केली. त्यांनी एक डझनहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

सतीश कौशिक यांच्या निधनासंबंधीच्या खालील बातम्या वाचा...

सतीश कौशिक यांच्यासोबत काय घडले?:ड्रायव्हरला म्हणाले - मला रुग्णालयात घेऊन चल!; अनुपम खेर यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी दिल्लीत एनसीआरमध्ये होते. ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी येथे आले होते. बुधवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आपल्या ड्रायव्हरला मला रुग्णालयात घेऊन चल असे म्हणाले. पण रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. सतीश कौशिक यांचे जिवलग मित्र अनुपम खेर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. येथे वाचा संपूर्ण बातमी...

सतीश कौशिक यांचे 66 व्या वर्षी निधन:कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते; रात्री प्रकृती बिघडली, रुग्णालयात मध्यरात्री 1.30 वा. मृत्यू

66 वर्षीय अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी मध्यरात्री दिल्लीत हार्ट अटॅकमुळे निधन झाले. ते 8 मार्च रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते. तिथे रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मध्यरात्री 1.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. येथे वाचा संपूर्ण बातमी...

कौशिक यांचा पहिलाच चित्रपट ठरला फ्लॉप:1993 मध्ये सर्वाधिक बजेटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, मुलाच्या मृत्यूने कोलमडले

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक सतिश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 13 एप्रिल 1967 रोजी महेंद्रगड, हरियाणात जन्मलेल्या सतिश यांचा चित्रपट प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मधून शिक्षण घेतलेल्या सतिश यांना कारकिर्दीत खूप संघर्ष करावा लागला. 1980 च्या सुमारास चित्रपटांतील त्यांचा संघर्ष सुरू झाला. 1987 मध्ये मिस्टर इंडिया चित्रपटातून कॅलेंडरच्या भूमिकेतून ओळख मिळाली. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...