आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Satyendar Jain Tihar Jail Update I Physiotherapists (IAP) On Delhi Ministers Treatment Claim | Latest News And Update 

मंत्री जैनांच्या फिजिओथेरपीचा दावा चूकीचा:IAP म्हणाले- मंत्र्यांनी माफी मागावी; सिसोदिया म्हणाले होते- जेलमध्ये उपचार सुरू होते

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट (IAP) ने दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये फिजिओथेरपी दिल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यासाठी मंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. जैन यांना उपचारासाठी फिजिओथेरपीची गरज असल्याचा दावा मनीष सिसोदिया यांनी केल्यानंतर हे वक्तव्य त्यानी केले आहे.

असोसिएशनच्या अध्यक्षांनी ट्विटरवर व्हिडीओ जारी करत म्हटले - फिजिओथेरपीचा प्राध्यापक म्हणून मी असे म्हणू शकतो की जेलमध्ये मंत्री सत्येंद्र जैन यांना फिजिओथेरपी दिली नव्हती. ते म्हणाले की- भारतभर अनेक फिजिओथेरपिस्ट तुरूंगात आहेत. हा फिजिओथेरपीचा अवमान करण्याचा मार्ग आहे. अशा प्रकारच्या मसाजला फिजिओथेरपी म्हणण्याचा आमची संघटना तीव्र निषेध व्यक्त करित आहे.

संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की, मी भारतातील सर्व फिजिओथेरपिस्टना आवाहन करतो. की त्यांनी वृत्तवाहिन्यांना लिहावे की कृपया फिजिओथेरपीचा अवमान करू नका. ही फिजिओथेरपी नाही. या कृत्याचा निषेध करूया. फिजिओथेरपीमध्ये रोग-विशिष्ट उपचार प्रोटोकॉल आहेत. व्हिडिओमध्ये जे दिसत आहे. ते त्या प्रकारच्या प्रोटोकॉलचा भाग नाही. याबाबत सत्येंद्र जैन यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

तिहार तुरुंगाचे माजी पीआरओ म्हणाले- मसाज हे फिजिओथेरपीपेक्षा वेगळे
याआधी शनिवारी तिहार तुरुंगाचे माजी पीआरओ सुनील गुप्ता म्हणाले की, ही फिजिओथेरपी असू शकत नाही. कारण दुसरा कैदी त्याला मसाज करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मसाज हे फिजिओथेरपीपेक्षा वेगळे आहे. रुग्णालयातील फिजिओथेरपीस्ट द्वारे वॉर्डमध्ये फिजिओथेरपी दिली जाते.

भाजपने मसाजचा व्हिडिओ शेअर केला
भाजपचे प्रवक्ते शहजाद यांनी शनिवारी बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचे व्हिडिओ शेअर केले होते. एक व्यक्ती जैन यांच्या पायाची, डोक्याची आणि शरीराची मालिश करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओनंतर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आम आदमीवर हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते की, आम आदमी पार्टी एक स्पा-मसाज पार्टी आहे, असे संबोधून त्यांनी आपवर टीका केली होती.

व्हिडिओ समोर येताच 'आप'ने जैनची बाजू घेतली
यानंतर आम आदमी पार्टीच्या वतीने जैन यांच्या बाजूने मैदानात उतरली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते फिजिओथेरपी घेत आहेत. तिहारचे व्हिडिओ लीक होऊन भाजप नेत्यापर्यंत कसे पोहोचले आहे. असा प्रश्न सिसोदिया यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजपने जैन यांच्या आजाराची अशा प्रकारे खिल्ली उडवणे लाजिरवाणे असल्याचे त्यांनीे म्हटले आहे.

व्हिडिओ यावेळी येण्याचा अर्थ; गुजरातच्या राजकारणात बसेल फटका
गुजरात निवडणुकीत 'आप' प्रामाणिकपणाला आपली सर्वात मोठी संपत्ती सांगित आहे. आतापर्यंत भाजपकडून सातत्याने यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र याचे कोणतेही ठोस पुरावे समोर येत नव्हते. भाजपने जे काही आरोप केले, ते 'आप'ने तेवढ्याच ताकदीने फेटाळून लावले. त्याउलट भाजपवरच खोटे असल्याचा आरोप केला गेला. हा व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या प्रतिमेला थेट हानी पोहोचवणारा आहे. कारण ते नाकारणे सोपे नाही. त्यामुळे भाजपच्या उर्वरित आरोपांनाही बळ मिळणार आहे. विशेषत: 10 दिवसांनंतर गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. दरम्यान, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...