आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Satyendra Jain Tihar Jail Massage Video Controversy |Tihar Officials Said He Is Not A Physiotherapist, He Was Rapist | Marathi News

सत्येंद्र जैन यांची मसाज करणाऱ्यावर बलात्काराचा आरोप:तिहारचे अधिकारी म्हणाले- तो फिजिओथेरपिस्ट नाही, गेल्या वर्षी अटक

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन, ज्या व्यक्तीकडून मसाज करून घेत होते, त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तिहारच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, तुरुंगात सत्येंद्र जैन यांना मसाज देणाऱ्या व्यक्तीचे नाव रिंकू आहे. त्याला POCSO कायद्यांतर्गत तिहारला पाठवण्यात आले आहे. तो फिजिओथेरपिस्ट नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जैन यांची प्रकृती खराब असून त्यांना फिजिओथेरपी दिली जात असल्याचे सांगितले होते.

तुरुंगातील सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये ही बातमी समोर आल्यावर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले- अच्छा, तर तो फिजिओथेरपिस्ट नव्हता. सत्येंद्र जैनला मसाज देणारा बलात्कारी होता. धक्कादायक. केजरीवाल यांनी उत्तर द्यावे की, सत्येंद्र जैन यांचा बचाव आणि फिजिओथेरपिस्टचा अपमान का केला?

3 दिवसांपूर्वी शहजाद पूनावाला यांनी काही व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामध्ये सत्येंद्र जैन जेलमध्ये मसाज करताना दिसत होते.

सिसोदिया म्हणाले होते - आजारपणाची खिल्ली उडवणे लज्जास्पद
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तत्काळ सत्येंद्र जैन यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. जैन आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तिहारचे व्हिडिओ लीक होऊन भाजपपर्यंत कसे पोहोचले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच जैन यांच्या आजारपणाची खिल्ली उडवणे हे लज्जास्पद असल्याचे म्हटले होते.

जैन यांना सुविधा देणारे महासंचालक आणि अधीक्षक सस्पेंड
सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी तिहार तुरुंगातील बॅरेक क्रमांक 7 चे अधीक्षक अजित कुमार यांना 14 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. याच्या 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबरला तिहारचे डीजी संदीप गोयल यांना हटवून त्यांच्या जागी संजय बेनिवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यावर तिहारमधील ठग सुकेश चंद्रशेखरकडून 10 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...