आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Satyendra Jain Tihar Jail, Video Controversy | Rouse Avenue Court Hearing | Arvind Kejriwal AAP Vs BJP Party I Latest News 

सत्येंद्र जैनांच्या याचिकेवर आज सुनावणी:राऊस अ‌ॅव्हेन्यू न्यायालयात जेलमधील सीसीटीव्ही फुटेज मीडियाला लीक न करण्याची मागणी

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये बंद असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांचे 5 व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ मीडियाकडे लीक होऊ नयेत, यासाठी त्यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली आहे. सत्येंद्र जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेत सीसीटीव्ही फुटेज प्रसारमाध्यमांसमोर येऊ नये, अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.

कोर्टाने तिहार जेल प्राधिकरणाला नोटीस बजावली
दुसरीकडे, न्यायमूर्ती विकास ढुल यांच्या खंडपीठाने तिहार तुरूंग प्रशासनाला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोटीसमध्ये म्हटले आहे की, जैन उपवास करत असतील तर त्यांना दिल्ली जेलच्या नियमानुसार जेवण देण्यात यावे.

  • जैन यांच्या वजनाची कोर्टाने मागितली माहिती
  • गेल्या सहा महिन्यात जैन यांना काय खायला दिले होते.
  • त्यांचा एमआरआय अजून व्हायचा आहे का
  • असेल तर तो आजपर्यंत का झाला नाही, याचे कारणही सांगा.

भाजपने गेल्या आठवड्यात सत्येंद्र जैन यांच्या तुरुंगातील जीवनाशी संबंधित 5 व्हिडिओ शेअर केले आहेत. या आधारे त्यांना कारागृहात सुविधा का दिल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

5व्या व्हिडिओत मंत्र्यांसाठी हॉटेलचे जेवण आले
तुरुंगात योग्य आहार न मिळाल्याचा आणि 28 किलो वजन कमी झाल्याचा आरोप आपने केल्यानंतर बुधवारी भाजपने हा दीड मिनीटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. फुटेजमध्ये 13 सप्टेंबर 2022 ही तारीख दिसत होती. सत्येंद्र जैन यांना बॅरेकमध्ये जेवण दिले जात आहे. एक व्यक्ती सतत त्याच्या सेवेत गुंतलेला या व्हिडिओत दिसून येत आहे. याआधीही जैन यांचे 4 व्हिडिओ समोर आले होते. वृत्तानुसार मंगळवारी सत्येंद्र जैन यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, त्यांना योग्य आहार आणि उपचार मिळत नाहीत. त्याचे वजन 28 किलोने कमी झाले आहे.

यापूर्वी ईडीवर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप होता
सत्येंद्र जैन यांचे वकील राहुल मेहरा आणि विवेक जैन यांनी याचिकेत सांगितले की, ईडीने जेव्हा त्यांना तिहार जेलमध्ये नेले तेव्हा त्यांचे वजन 103 किलो होते. आता 75 किलो शिल्लक आहे. योग्य आहार न मिळाल्याने त्याने 28 किलो वजन कमी केले आहे. यापूर्वी त्यांनी ईडीवर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला आहे. कोर्टाचे आदेश आणि दिलेले आश्वासन न जुमानता ईडी संवेदनशील माहिती प्रसारमाध्यमांना लीक करत असल्याचे वकील राहुल यांनी म्हटले होते. मात्र, ईडीचे वकील जोहेब हुसैन यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते याचिकेत म्हणाले आहे की, मुंबई हल्ल्यातील दोषी कसाबवरही निष्पक्ष खटला चालला आहे, सत्येंद्र जैन त्यांच्यापेक्षा वाईट नाहीत, असे मेहरा यांनी न्यायालयाला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...