आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Savarkar Had Appealed For Mercy On Gandhiji's Request, Mahatma Gandhi Had Also Appealed On His Behalf: Rajnath

संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य:गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दयेचा अर्ज केला होता, महात्मा गांधी यांनीही स्वत:च्या वतीने अपील केले होते : राजनाथ

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावरकर कारागृहात होते, ते गांधीजींशी कधी बोलले : बघेल

कारागृहात बंदिवासात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून इंग्रजांकडे माफीची याचिका दाखल केली होती, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत मंगळवारी सावरकरांवरील एका पुस्तकाचे प्रकाशन करताना राजनाथसिंह म्हणाले की, सावरकरांविषयी अनेक प्रकारचा खोटारडा प्रचार केला जात आहे. सावरकरांनी इंग्रजांसमोर अनेकदा दया याचिका दाखल केल्याचे सांगितले जाते. मात्र वास्तव असे आहे की, सावरकरांनी हे सर्व गांधीजींच्या सांगण्यावरून केले होते. महात्मा गांधी यांनीही आपल्या वतीने अपील केले होते. सावरकर यांची सुटका केली जावी, असे ते म्हणाले होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आम्ही जसे शांततेने आंदोलन करत आहोत तसेच सावरकरही करतील. या वेळी सरसंघचालकही म्हणाले की, सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू आहे. दुसरीकडे, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राजनाथ सिंग व मोहन भागवतांवर टीका केली आहे. ते म्हणाले, इतिहास मोडतोड करून सांगितला जात आहे. हे असेच सुरू राहिले तर एखाद्या दिवशी ते महात्मा गांधी यांच्याऐवजी सावरकरांना राष्ट्रपिता करून टाकतील.

सावरकर कारागृहात होते, ते गांधीजींशी कधी बोलले : बघेल
नवी दिल्ली | छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बघेल म्हणाले, सावरकर कारागृहात होते. ते महात्मा गांधींशी कसे बोललेॽ त्या वेळी महात्मा गांधी कुठे होतेॽ सावरकर कुठे होतेॽ सावरकर कारागृहात होते. दोघांनी कसा वार्तालाप केलाॽ सावरकर कारागृहात असताना त्यांनी ब्रिटिश सरकारकडे दयेची याचिका दिली हाेती अाणि ते ब्रिटिशांना सहकार्य करत हाेते. एवढेच नव्हे तर १९२५ मध्ये कारागृहातून बाहेर अाल्यानंतर द्विराष्ट्राबद्दल बाेलणारे पहिले व्यक्ती होते. काँग्रेस नेते जयराम रमेश आणि एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी यासंदर्भात गांधीजींच्या संदर्भाने २५ जानेवारी १९२० चे पत्र सोशल मीडियावर अपलोड केले. ते म्हणाले की, सावरकरांनी १९११ मध्ये पहिल्यांदा याचिका दाखल केली होती. तेव्हा गांधीजी दक्षिण अाफ्रिकेत होते. सावरकरांनी १९१३-१४ मध्ये दुसरी याचिका दाखल केली. गांधीजींचा सल्ला तर १९२० मध्ये मिळाला होता.

सावरकरांनी माफी मागितली नाही : खासदार संजय राऊत
पुणे | शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, सावरकरांनी कधीच इंग्रजांची माफी मागितली नाही. ते म्हणाले की, अनेक वर्षे कारागृहात राहत असताना स्वातंत्र्यसेनानी कारागृहातून बाहेर येण्यासाठी रणनीती म्हणून असे करतात. जेलमध्ये राहण्याऐवजी बाहेर येऊन काहीतरी करावे, असा त्यांचा विचार असतो.

बातम्या आणखी आहेत...