आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Savarkar's Photo Among Freedom Fighters At Temple Festival, Deleted After Controversy, Biggest Festival In Kerala From Today In Thrissur

मोठा उत्सव:मंदिर उत्सवात स्वातंत्र्यसैनिकांमध्ये सावरकरांचा फोटो, वादानंतर हटवला, त्रिशूरमध्ये आजपासून केरळातील सर्वात मोठा उत्सव

तिरुवनंतपुरम| ​​​​​​​के.ए. शाजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या त्रिशूरपुरममध्ये मंगळवारी सुरू होणाऱ्या सर्वात मोठ्या मंदिर उत्सवात वीर सावरकरांचा फोटो लावण्यावरून वाद झाला. मंदिर उत्सवातील कुडामत्तमच्या विधीदरम्यान छत्र्यांचे प्रदर्शन होते. या छत्र्यांवर महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुब्रमण्यम भारतींसारख्या स्वातंत्र्यसेनानींसह वीर सावरकरांचा फोटोही लावला गेला. कुडामत्तम विधीदरम्यान मंदिरातील हत्तींचे भव्य प्रदर्शनही भरवले जाते. उत्सवादरम्यान प्रदर्शित होणाऱ्या छत्र्यांवर सावरकरांचा फोटो इतर स्वातंत्र्यसेनानींबरोबर लावल्याचे प्रकरण सर्वात आधी सोशल मीडियावर आले होते. त्यानंतर युवक काँग्रेस आणि सीपीआयची विद्यार्थी आघाडी फोटोच्या विरोधात रस्त्यावर उतरली. त्यांचे म्हणणे होते की, भाजप मंदिर उत्सवाला राजकीय रंग देऊ पाहत आहे. विरोध वाढला आणि मंगळवारी मंदिर उत्सव पाहता आयोजनाशी संबंधित पारामेक्कावू देवस्वम बोर्डाने समारंभात हे फोटे असलेल्या छत्र्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला. बोर्ड अध्यक्ष राजेश मेनन म्हणाले की, विरोधामुळे या छत्र्या न लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही.

सावरकर स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत : बोर्ड
त्रिशूर मंदिर उत्सवाचे आयोजन पारामेक्कावू देवस्वम आणि थिरुवमबाडी देवस्वम करते. पारामेक्कावू बोर्डाचे अध्यक्ष राजेश मेनन यांचे म्हणणे आहे की, सावरकरांचे नाव केंद्र सरकारच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत आहे. कुडामत्तमच्या विधीवेळी बोर्डाकडून आजवर कधीच लोकांच्या चित्रांचा वापर केला गेला नाही. तेे मंदिरातील देवी-देवतांनाच सर्वोच्च मानतात. मेनन यांना विचारले की, ते सावरकरांना स्वातंत्र्यसेनानी मानतात का? यावर ते म्हणाले की, सध्या यावर चर्चा करणे उचित ठरणार नाही.

हा स्वातंत्र्याचा अमृत उत्सव, सावरकरांचा फोटो हवा : गोपी
भाजपचे राज्यसभा सदस्य आणि मल्याळम अभिनेते सुरेश गोपी यांचे म्हणणे आहे की, हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आमच्याकडून कुडामत्तममध्ये छत्र्यांवर भाजपच्या कोणत्याही नेत्याचा फोटो लावण्यास सांगितले नाही. स्वातंत्र्यसंग्रामात सावरकरांचे योगदान नाकारता येत नाही.

मोठ्या संख्येने लोक जमतात, कुडामत्तम प्रमुख आकर्षण
त्रिशूरपुरम मंदिर उत्सवात छत्र्यांच्या प्रदर्शनाचे कुडामत्त सर्वात मोठे आकर्षण असते. ते बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमतात. ४ मेपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता १० मे राजी होईल. उत्सवाच्या समाप्तीवर आतषबाजीही केली जाईल. त्रिशूरच्या थेक्किनकाडू मैदानात होणाऱ्या या भव्य आयोजनात सध्या केरळसह शेजारी राज्यातील लोकही येत आहेत. सुमारे २५० हून अधिक कलावंतही आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...