आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Savarkar's Picture Put Up In Karnataka Assembly; Uproar, BJP Question; Do You Want To Put A Picture Of Dawood Ibrahim?

सावरकर यांच्या चित्राचे अनावरण:कर्नाटक विधानसभेत लावले सावरकरांचे चित्र; गदारोळ, भाजपचा सवाल; दाऊद इब्राहिमचे चित्र लावायचे का?

बेळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभेत सोमवारी विनायक दामोदर सावरकर यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. यानंतर काँग्रेस आमदारांनी कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या बाहेर निषेध आंदोलन केले. तथापि, हिवाळी अधिवेशन राजधानी बंगळुरूबाहेर बेळगावात घेण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून वाल्मीक, बसवण्णा, कनक दास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल आदी महापुरुषांची चित्रे लावण्याची विनंती केली.

काहीतरी करून विधानसभेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी केला. कारण आम्ही त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे उचलणार आहोत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी दिल्लीत म्हणाले, वैचारिक मतभेद असले पाहिजेत. सावरकर एक स्वातंत्र्यसेनानी आहेत. मग कुणाचे चित्र लावायचे? दाऊद इब्राहिमचे? हे सिद्धरामय्यांनाच विचारा.

बातम्या आणखी आहेत...