आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • SBI BANK ; FD ; Fixed Deposit ; New Interest Rates Applicable On All FDs Of SBI, Now FDs Of 5 To 10 Years Will Get 5.3% Interest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राहकांचे नुकसान:एसबीआयची एफडीवर मिळणाऱ्या व्याज दरात एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात, जाणून घ्या नवीन व्याज दर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँकेने सर्व कालावधीतील एफडीवरील व्याज दरात 0.40% कपात केली, नवीन दर 27 मे पासून लागू
  • एसबीआयने 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्तीच्या बल्क एफडीवररही 50 बीपीएसपर्यंत कपात केली आहे

देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने एफडीवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सर्व कालावधीतील एफडीवरील व्याज दरात 0.40% कपात केली आहे. नवीन दर 27 मे पासून लागू होतील. याशिवाय बँकेने 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्तीच्या बल्क एफडीवरही 50 बीपीएसपर्यंत कपात केली आहे. या श्रेणीत बँक जास्तीत जास्त तीन टक्के व्याज देत आहे. यापूर्वीही एसबीआयने या महिन्यात एफडीवर मिळणाऱ्या व्याज दरात कपात केली होती.

एसबीआय आता एफडीवर किती व्याज देईल

कालावधी

सामान्य नागरिकांसाठी नवीन दर (%)जेष्ठ नागरिकांसाठी नवीन दर (%)
7 ते 45 दिवस    2.93.4
46 ते 179 दिवस 3.94.4
180 ते 210 दिवस4.44.9
211 दिवस ते एक वर्ष4.44.9
एक ते दोन वर्षे 5.15.6
दो ते तीन वर्षे 5.15.6
तीन ते पाच वर्षे5.35.8
पाच ते 10 वर्षे5.46.2

सेविंग अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजातही कपात

एसबीआयने 12 मे रोजी फिक्स्ड डिपॉजिट (एफडी)वर मिळणाऱ्या व्याजात 0.20 % कपात केली होती. यानंतर एसबीआयने सेविंग अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजातही कपात केली होती. यात आता जमा रकमेवर 2.75 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे, आधी हे 3 टक्के होते.

बातम्या आणखी आहेत...