आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे वृत्त:ऑनलाइन बँकिंग सर्व्हिस ठप्प, मात्र ATM आहे सुरू; बँकने म्हटले - धैर्य ठेवा, सेवा लवकरच सुरू होईल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयची देशभरात 22 हजारांपेक्षा जास्त ब्रांच आहे

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ऑनलाईन बँकिंग सेवांना चांगलाच फटका बसला आहे. मात्र, याचा एटीएम व पीओएस मशीनवर परिणाम झालेला नाही. देशाच्या सर्वोच्च बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की कनेक्टिव्हिटीच्या मुद्यामुळे कोअर बँकिंग यंत्रणेत उशीर होत आहे. एटीएम आणि पीओएस वगळता सर्व चॅनेल प्रभावित झाले आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना धीर धरण्याचे आवाहन करतो. सामान्य सेवा लवकरच पुन्हा सुरू होईल. दुपारपर्यंत सेवा पूर्ववत होईल असे बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सर्वात मोठी कमर्शियल बँक आहे SBI
एसबीआई देशात असेट्स, डिपॉजिट, शाखा, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिशोबाने सर्वात मोठी कमर्शियल बँक आहे. ही देशात सर्वात जास्त उधारी देणारी बँक आहे. 30 जून 2020 पर्यंत बँकेजवळ एकूण 34 लाख कोटी रुपयांचे डिपॉझिट होते. चालू आणि बचत खात्यांचे (सीएएसए) प्रमाण 45 टक्क्यांहून अधिक आहे. याची उधारी 24 लाख कोटींच्या जवळपास आहे.

देशभरात बँकचे 22,000 पेक्षा अधिक ब्रांच
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयची देशभरात 22 हजारांपेक्षा जास्त ब्रांच आहे. एसबीआयच्या 30 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. SBI चे 6.6 कोटींपेक्षा जास्त ग्राहक मोबाइल बँकिंग आणि ATM च्या सुविधेचा वापर करतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser