आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील मुलींना मोठा दिलासा:एनडीए परिक्षेत आता मुलींनाही संधी, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 5 सप्टेंबर रोजी होणार एनडीएची परीक्षा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील मुलींनाही एनडीए परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुलीही एनडीएची परीक्षा देऊ शकतात असा निर्णय न्यायालयाने दिला.

दरम्यान, ही परीक्षा 5 सप्टेंबरला होणार आहे. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालायने याबाबतचा निर्णय दिला आहे. महिलांना दिल्या जाणाऱ्या संधीचा विरोध केल्यामुळे कोर्टाने भारतीय सेनादलाला फटकारले आहे. त्यासोबतच तुमचा दृष्टीकोन बदला, असा सल्लाही दिला. न्यायमुर्ती जस्टिस संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने बुधवारी हा महत्वाचा निर्णय दिला. एनडीएमध्ये महिलांना संधी देण्यात यावी, अशी कुश कालरा यांनी याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.

बातम्या आणखी आहेत...