आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government's Review Meeting Today Regarding The Scheme, Army Chief Appealed To The Youth To Become Agniveer | 10% Reservation For Firefighters In Central Armed Forces And Assam Rifles; Congress Announces Agitation

'अग्निपथ'ने पेटला देश:गृह मंत्रालयानंतर संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांतही अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या विविध राज्यांत अग्निपथ योजनेविरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने अग्निवीरांना आपल्या खातेनिहाय भरत्यांत 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या इंडियन कोस्ट गार्ड व डिफेंस सिव्हिलियन पोस्टसह डिफेंस पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या 16 कंपन्यांतील नियुक्त्यांतही अग्निवीरांना आरक्षण मिळेल.

तत्पूर्वी, गृह मंत्रालयानेही केंद्रीय सशस्त्र पोलिस दल व आसाम रायफल्समधील भरतीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाने वयोमर्यादेतही 3 ते 5 वर्षाची सूट देण्याची घोषणा केली आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशात गत 3 दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. जौनपूरमध्ये दंगेखोरांनी रोडवेज बस व अनेक दुचाकींची जाळपोळ केली. तर बिहारमध्ये गोळीबार झाला. राजस्थानातही शेकडो तरुण मोठ्या संख्येने निदर्शने करत आहेत. सरकारने या योजनेत विविधांगी सुधारणा केल्यानंतरही आंदोलन चिघळतच आहे.

केंद्रीय सशस्त्र दल व आसाम रायफल्समध्ये 10% आरक्षण

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. अग्निवीरांना दोन दलांमध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात आली होती. अग्निवीरच्या पहिल्या बॅचसाठी वयाची शिथिलता 5 वर्षे असेल.

काँग्रेसची आंदोलनाची हाक

देशभरात गदारोळ सुरू असताना काँग्रेस पक्षानेही अग्निपथ योजनेला विरोध करण्याची घोषणा केली आहे. रविवारी दिल्लीतील जंतरमंतरवर काँग्रेस नेते आंदोलन करणार असून, त्यात पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत.

आज बिहार बंदची हाक

लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात शुक्रवारी देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली. या योजनेच्या विरोधात बिहारमधील विद्यार्थी संघटनांनी शनिवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. राजदनेही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. आरजेडीच्या बिहार युनिटचे अध्यक्ष जगदानंद सिंह म्हणाले की, अल्पकालीन भरती योजना देशातील तरुणांच्या हिताची नाही. त्याचबरोबर डाव्या पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शनिवारी या योजनेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत नौदल प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लष्करप्रमुख शनिवारी हवाई दलाच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी हैदराबाद येथील दुंडीगल येथे जाणार असल्याने ते या बैठकीत सहभागी होणार नाहीत. जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी तरुणांना सैन्यात भरती होऊन अग्निवीर बनण्याचे आवाहन केले.

2 दिवसात 12 गाड्या जाळल्या

रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, बुधवारी आंदोलन सुरू झाल्यापासून 12 गाड्या जाळण्यात आल्या आहेत. या कालावधीत 300 हून अधिक गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. 214 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 11 वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान 90 रेल्वेगाड्या त्यांच्या थांब्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करू नका, असे आवाहन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.

नौदल प्रमुख म्हणाले - असा विरोध अपेक्षित नव्हता

नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी शुक्रवारी देशभरातील निषेधाच्या पार्श्वभूमीवर अग्निपथ योजनेबाबत विधान केले. ते म्हणाले की, मला अशा प्रकारच्या निषेधाची अपेक्षा नव्हती. आम्ही जवळपास दीड वर्ष अग्निपथ योजनेवर काम केले. भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील हे सर्वात मोठे परिवर्तन आहे. योजनेची चुकीची माहिती आणि गैरसमज यामुळे आंदोलने होत आहेत.

ही योजना देशासाठी आणि तरुणांसाठी फायदेशीर आहे कारण त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक संधी निर्माण होणार आहेत. जिथे पूर्वी एका व्यक्तीला सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी मिळायची, आता ती बहुधा 4 जणांना मिळणार आहे.

शॉर्ट सर्विस लाइफच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, याचे अनेक फायदे आहेत. अग्निवीरांना ठरवायचे आहे की त्यांना सशस्त्र दलात करिअर म्हणून काम करायचे आहे की दुसरी नोकरी करायची आहे.

लष्करप्रमुख मनोज पांडे
लष्करप्रमुख मनोज पांडे

म्हणाले - अग्निपथ योजना तरुणांसाठी फायदेशीर

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही तरुणांना सैन्यात भरती होऊन अग्निवीर बनण्याचे आवाहन केले आहे. जनरल पांडे यांनी शुक्रवारी अग्निपथ योजनेअंतर्गत उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या निर्णयामुळे त्या तरुणांना संधी मिळणार आहे जे सैन्यात भरती होण्याच्या तयारीत आहेत, परंतु कोविडमुळे ठप्प झालेल्या भरतीमुळे गेल्या दोन वर्षांत ते सामील होऊ शकले नाहीत.

जनरल पांडे म्हणाले- मला वाटते की तरुणांना अग्निपथ योजनेची योग्य माहिती मिळू शकलेली नाही. एकदा त्यांना या योजनेची माहिती मिळाल्यावर, ही योजना केवळ तरुणांसाठीच नाही तर सर्वांसाठी फायदेशीर आहे याची त्यांना खात्री होईल.

तरूण चार वर्षे संरक्षण दलात सेवा देतील

केंद्र सरकारने 14 जून रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दल या लष्कराच्या तीन शाखांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी अग्निपथ भरती योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत तरुणांना केवळ 4 वर्षे संरक्षण दलात सेवा द्यावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

1. अग्निपथ योजना काय आहे?
अग्निपथ योजना ही सशस्त्र दलांसाठी देशव्यापी अल्पकालीन तरुण भरती योजना आहे. या योजनेंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाईल. अग्निवीर वाळवंट, पर्वत, जमीन, समुद्र किंवा हवेसह विविध ठिकाणी तैनात केले जातील.

2. अग्निवीरांचा दर्जा काय असेल?
या नव्या योजनेत अधिकारी पदापेक्षा कमी दर्जाच्या सैनिकांची भरती केली जाणार आहे. म्हणजेच त्यांची रँक ऑफिसर रँकच्या खाली असलेले कार्मिक म्हणजेच पीबीओआर असेल. या सैनिकांची रँक आता लष्करातील कमिशन्ड ऑफिसर आणि नॉन-कमिशन्ड ऑफिसर नियुक्तीपेक्षा वेगळी असेल.

3. एका वर्षात अग्निवीरची किती वेळा भरती केली जाईल?
या योजनेंतर्गत वर्षातून दोनदा रॅलीद्वारे भरती करण्यात येणार आहे.

4. यावर्षी किती सैनिकांची भरती होणार आहे?
यंदा 46 हजार अग्निवीरांची भरती होणार असली तरी या कालावधीत लष्कराच्या तिन्ही भागांमध्ये या दर्जाची सैन्य भरती होणार नाही.

5. अग्निवीर होण्यासाठी किती वय आवश्यक आहे?
अग्निवीर होण्यासाठी 17.5 वर्षे ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

6. अग्निवीर होण्यासाठी किती शिक्षण आवश्यक आहे?
अग्निवीर होण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...