आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर सतत असलेले धोके आणि लष्करात तरुण अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन भारतीय लष्कर आपल्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा (एसएससी) पर्याय आणखी चांगला आणि आकर्षक बनवण्याचा आराखडा तयार करत आहे.
एसएससीकडे तरुणांचा कल कमी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याद्वारे मिळणारी १४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर नागरी जीवनात चांगल्या संधी मिळत नाहीत. पण आता ही कमतरता भरून काढण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अधिकाऱ्यांना एक वर्षाचे व्यावसायिक प्रशिक्षण सेवेत असतानाच देण्याची लष्कराची योजना आहे. दुसरा पर्याय असाही दिला जात आहे की, त्यांनी सेवेत असताना एक वर्षाची शैक्षणिक रजा घ्यावी आणि त्या काळात आपल्या मनाप्रमाणे करिअर करण्यासाठी गैरलष्करी संस्थेत प्रशिक्षण घ्यावे. याबाबत ‘दैनिक भास्कर’च्या प्रश्नाच्या उत्तरात लष्करप्रमुख एम. एम. नरवणे म्हणाले की, लष्कराचा चेहरा तरुण असणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्नल आणि त्याखालच्या रँकमध्ये जास्तीत जास्त युवकांची गरज आहे. पण सध्याची स्थिती अशी आहे की, २०० युवकांची गरज भासते तेव्हा फक्त १०० तरुणच मिळतात. लष्करी प्रकरणांच्या विभागाने लष्करात व्यापक सुधारणांचा एक आराखडा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सरकारसमोर ठेवला आहे आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणखी चांगले करण्याची योजना हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यातून लष्कराचे दोन हेतू साध्य होतील. अधिकारी तरुण असतीलच, त्याशिवाय संरक्षण निवृत्तिवेतन निधीवरही अंकुश राहील. हा निधी वाढत-वाढत आता तब्बल १३३ लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
एसएससीत सुधारणा करण्याच्या योजनेमुळे अधिकारी तरुण असतील, त्यांची कमतरताही भासणार नाही व्यावसायिक प्रशिक्षण व शैक्षणिक रजेव्यतिरिक्त या अधिकाऱ्यांना सेवाकाळ पूर्ण झाल्यावर चांगली एकरकमी निधी देण्याचाही प्रस्ताव आहे. स्टार्टअप सुरू करायचा असेल तर निधी कमी पडू नये हा त्याचा हेतू आहे. लष्करात अधिकाऱ्यांची ४६ हजार मान्यताप्राप्त पदे आहेत, पण ११ हजार अधिकाऱ्यांची कमतरता नेहमीच भासते. एसएसीत सुधारणा करण्याच्या योजनेमुळे ही समस्याही दूर होऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.