आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • School Canteens, Ban On Sale Of Junk Food Within 50 Meters, Fast Food Advertisements Will Also Be Banned

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पौष्टिक अन्नाला प्रोत्साहन:शाळेतील कँटीन, 50 मीटर क्षेत्रात जंकफूड विक्रीवर बंदी, फास्टफूडच्या जाहिरातींनाही असेल प्रतिबंध

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळावे या हेतूने उचलले पाऊल

भारतीय अन्नसुरक्षा तसेच मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) शाळेतील कँटीन आणि शाळेपासून ५० मीटर क्षेत्रात जंकफूड विक्री तसेच याच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. मुलांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळावे या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एफएसएसएआयने मंगळवारी स्पष्ट केले की, मुलांना सुरक्षित अन्न व पौष्टिक आहार अधिनियम -२०२० लागू करण्यात आला आहे. हा नियम काटेकोरपणे लागू केला जाण्यापूर्वी सर्व जंकफूड उत्पादक, शाळा व्यवस्थापन आणि इतर संबंधितांना याची माहिती दिली जाईल. यानंतर सर्व राज्यांतील शिक्षण अधिकारी तसेच शालेय शिक्षण विभागांना संबंधित शाळेतील मुलांना सुरक्षित व संतुलित तसेच पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले जातील. नियमानुसार, ज्या आहारामध्ये अधिक साखर, मीठ याचा वापर केलेला असतो तो आहार किंवा खाद्यपदार्थ शाळेची कँटीन, मुलांचे वसतिगृह तसेच शाळेपासून ५० मीटर क्षेत्रात विकता येत नाही. यात अशा खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवरही बंदी आहे.

बातम्या आणखी आहेत...