आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • School news update school reopening july 1st 2020 state wise status updates school open date in chhattisgarh rajasthan madhya pradesh bihar jharkhand haryana uttar pradesh and maharashtra

शाळांबाबत 10 राज्यातून रिपोर्ट :महाराष्ट्र, यूपी, छत्तीसगडसह अनेक राज्ये शाळा उघडण्याच्या विरोधात, ऑनलाइन आणि डिस्टंस एजुकेशनला प्राधान्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • राज्यांनी म्हटले- अनेक शाळांना क्वारेंटाइन सेंटर बनवण्यात आले आहे, त्यांना रिकामे करणे शक्य नाही
 • केंद्र सरकारकडून गाइडलाइन मिळाल्यानंतर आणि पालकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय होईल

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्ये जुलैमध्ये शाळा उघडण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणने आहे की, कोरोनाचा वाढता धोका आणि अनेक शाळेंना क्वारेंटाइन सेंटरमध्ये बदलण्यात आल्याने सध्या शाळा सुरू करणे शक्य नाही.

तसेच, अनेक राज्ये केंद्राच्या गाइडलाइनटी वाट पाहत आहेत. दोन दिवसानंतर सर्व राज्यांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे चर्चा केली जाईल. परंतू, अंतिम निर्णय पालकांशी चर्चा केल्यानंतरच होईल. सध्या, ऑनलाइन आणि डिस्टेंस एजुकेशनला प्राध्यान्य देण्यावर शाळा भर देत आहेत. 

 • महाराष्ट्र: इंटरनेट नसलेल्या भागात शाळा उघडणार, इतर ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाला प्राध्यान्य

कोरोना संक्रमणामुळे सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र शाळा उघडण्याच्या रणनितीवर काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे की, ज्या परिसरात इंटरनेट कनेक्टिविटी आणि संक्रमण नाही, तिथे शाळा उघडल्या जाऊ शकतात. परंतू, इतर ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला हवे.

 • मध्य प्रदेश: 30 जूनपर्यंत सुट्टी घोषित, गाइडलाइन तयार केली जात आहे
 • राजस्थान: सरकारकडून शाळा उघडण्यासंबंधी कोणतीच तयारी नाही
 • उत्तर प्रदेश: तारीख अद्याप ठरलेली नाही. परंतू, जुलैमध्ये शाळा सुरू करण्यावर फोकस.
 • छत्तीसगड: जुलैमध्ये शाळा सुरू होणार नाहीत. केंद्रासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय ठरेल.
 • झारखंड: अद्याप सरकारकडून कोणताच निर्णय नाही. पण, शाळा प्लॅनिंग करत आहेत.
 • चंडीगड: जुलै किंवा ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्यावर विचार.
 • हरियाणा: तीन टप्प्यात शाळा उघडणार, 7 जूनपर्यंत रिपोर्ट मागवली.
 • बिहार: शाळा उघडल्यावर 10 मुद्द्यांवर रिपोर्ट मागितली.
 • पंजाब: राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाउन. शाळेबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही.
0