आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देशात उद्यापासून अंशत: उघडतील शाळा:कुठे शिक्षकांची चाचणी आवश्यक, कुठे मास्क नाही; सुरक्षेसाठी केला 100 मुलांचा गट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र लंडनमधील एका प्राथमिक शाळेचे आहे. मास्कचे बंधन नाही...
  • वाचा जगभरात सध्या मुले कोणत्या सुरक्षा उपायांसह जात आहेत शाळेत...

जगातील अनेक देशांत मुले शाळेत जाऊ लागली आहेत. भारतातही २१ सप्टेंबर म्हणजे उद्यापासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होत आहेत. काही देशांत रुग्ण कमी असल्याने शाळा सुरू होत आहेत, तर काही देश असेही आहेत, जेथे रुग्ण सतत वाढत असतानाही सुरक्षा उपायांसह शाळा सुरू केल्या जात आहेत. रशियातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांसाठी कोरोना तपासणी आवश्यक आहे, तर इंग्लंडमध्ये मास्कची सक्ती शाळांवर सोपवण्यात आली आहे.

फ्रान्स |११ वर्षांवरील लोकांना मास्क सक्ती
येथे १ सप्टेंबरला शाळा सुरू झाल्या. मात्र, पहिल्या आठवड्यातच अनेक शाळांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने २२ शाळा बंद करण्यात आल्या. येथे जूनमध्येही शाळा सुरू झाल्या होत्या. सध्या फ्रान्समध्ये ११ वर्षांपेक्षा मोठी मुले आणि शिक्षकांना मास्क सक्तीचा आहे. ज्या शाळेत रुग्ण आढळतील त्या बंद केल्या जातील.

बेल्जियम |सुट्यांनंतर १४ दिवस घरी राहतील
बेल्जियममध्ये पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्तीच्या मुलांना १ सप्टेंबरपासून शाळेत बोलावण्यात आले आहे. जे संवेदनशील भागातील आहेत त्यांनाच फक्त शाळेत येण्यास बंदी आहे. जी मुले सुट्यांमध्ये एखाद्या बाधित भागातून परतली असतील ती १४ दिवस शाळेत येऊ शकणार नाहीत.त्यांना घरीच थांबावे लागेल.

ब्रिटन|येथे मास्कचे नियम कडक नाहीत
इंग्लंडमध्येही एक कोटीपेक्षा जास्त मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, येथे पूर्ण देशातील शाळांसाठी मास्क घालण्याचा एकच नियम नाही. सरकारने ते शाळांवर सोपवले आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना मास्क घालणे आवश्यक नाही. मात्र, येथे अनेक शाळांमध्ये रुग्ण आढळल्याने त्या पुन्हा बंद करण्यात आल्या.

चीन | २० कोटी मुले परतली शाळेत
चीनमध्ये सरकारी शाळेत शिकणारी १९.५ कोटी मुले शाळेत परतली. वुहानमध्येही १ सप्टेंबरला २८४० प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. मुलांचे सकाळी घरी व शाळेच्या प्रवेशद्वावर तापमान मोजणे आवश्यक आहे. मुलांचा प्रवास इतिहास तपासला जात आहे. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही शिक्षकांसह फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करायला लावत आहेत.

...या देशात हे नियम
- रशियात सर्व ८५ भागांत शिक्षक व मुलांसाठी मास्क सक्ती नाही. बहुतांश शाळांत शिक्षकांना कोरोना चाचणी आवश्यक. शाळेत मुलांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे.

- जर्मनी आणि नाॅर्वेत शाळा सुमारे १००-२०० मुलांचे गट करत आहेत आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी काही शिक्षकांवर सोपवली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एका गटातील मुले दुसऱ्या गटातील मुलांना भेटू शकणार नाहीत.