आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • School Teacher Electrocuted As High Tension Line Falls On Her In Banswara, Rajasthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करंट लागून स्कूटीसह जळाली महिला:स्टूटीवरुन शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पडली 11KV विजेची तार, जागेवरच झाला कोळसा

बांसवाडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो काळजात धडकी भरवणारा आहे, पण घटनेची दाहकता दाखवण्यासाठी लावण्यात आला आहे - Divya Marathi
हा फोटो काळजात धडकी भरवणारा आहे, पण घटनेची दाहकता दाखवण्यासाठी लावण्यात आला आहे
  • जीवाच्या भीतीपोटी कोणीही महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही

बांसवाडा जिल्ह्यातील नोगामामध्ये गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. स्कूटीवरून शाळेत जात असलेल्या एका शिक्षिकेवर 11KV विजेची तार पडली. या दुर्घटनेत त्या महिलेचा स्टूटीसह जळून कोळसा झाला.

घटना स्थळावरील लोकांनी सांगितले की, ही दुर्घटना गुरुवारी सकाळी 10 वाजता घडली. मृत्यू झालेली महिला शिक्षिका पीमल पाटीदार नदीजवळून जात होती. यावेळी अचानक त्यांच्यावर विजेची तार पडली. घटनेच्या काही वेळापूर्वीच पाऊस पडला होता आणि यामुळे संपूर्ण रस्ता ओला होता. विजेची तार पडताच स्कूटीला आणि महिलेच्या अंगाला आग लागली. यावेळी आपल्यालाही करंट लागेल, या भीतीने कोणीच महिलेच्या जवळ गेले नाही. या दुर्दैवी घटनेत महिलेचा कोळसा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाला पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser