आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चायनीज मांजाने कापला गळा:स्कूटरवरुन जात असताना पतंगाच्या मांजात मान अडकली; गळा चिरल्याने तरुणीचा जागीच मृत्यू, उज्जैनमधील धक्कादायक घटना

उज्जैन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैनमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थीनीची चायनीज मांजाने हत्या केली आहे. तरुणी तिच्या चुलत बहिणीसोबत स्कूटरवरून जात होती. झिरो पॉइंट पुलावर मांजा तिच्या गळ्यात अडकून गळा चिरला गेला. गळा चिरल्याने या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी तडफडत होती अन् लोकांनी तमाशा पाहिला -
मृत विद्यार्थिनीचे नाव नेहा अंजना आहे. ती महिदपूर तहसीलच्या नारायणा गावची रहिवासी आहे. सध्या ती उज्जैनला तिच्या मामाच्या घरी शिकण्यासाठी आली होती. नेहा तिच्या मामाच्या मुलीसोबत इंदिरा नगरहून फ्रीगंजला निघाली होती.

या अपघातात नेहाची बहीणही जखमी झाली आहे. बहिणीने सांगितले की, अपघातानंतर नेहाला बराच वेळ घटनास्थळीच तडफडत होती आणि तिचे बरेच रक्त वाया गेले, परंतु तेथून जाणारे लोकांनी फक्त तमाशा पाहिला. कोणीही मदत केली नाही. त्यानंतर तेथून निघालेले वकील रवींद्र सिंह सेंगर यांनी त्यांना मदत केली. सेंगर यांनी जखमी विद्यार्थिनीला आपल्या कारमध्ये बसवले आणि पाटीदार रुग्णालयात नेले, परंतु तिचा आधीच मृत्यू झाला होता.

याची माहिती नेहाच्या नातेवाईकांना देण्यात आली. माधवनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे टीआय मनीष लोढा यांनी सांगितले.

बंदी असतानाही बाजारात चायनीज मांजा बिनधास्तपणे विकला जातो, मात्र तो सामान्य मांजासारख्या धाग्याऐवजी नायलॉनपासून बनवला जातो. (फाइल फोटो)
बंदी असतानाही बाजारात चायनीज मांजा बिनधास्तपणे विकला जातो, मात्र तो सामान्य मांजासारख्या धाग्याऐवजी नायलॉनपासून बनवला जातो. (फाइल फोटो)

यामुळे धोकादायक आहे चायनीज मांजा
चायनीज मांजा याला प्लास्टिक मांजा असेही म्हणतात. चायनीज मांजा हा इतर मांजासारखा धाग्याने बनवला जात नाही. हा नायलॉन आणि धातूची पावडर मिसळून तयार केला जातो. हे प्लास्टिकसारखे वाटते आणि ताणण्यायोग्य आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ते खेचले जाते तेव्हा ते तुटण्याऐवजी वाढते. तो मांजा ब्लेडसारखा धारदार असून त्याच्या विक्रीवर बंदी आहे, मात्र बंदी असतानाही त्याची खुलेआम खरेदी-विक्री सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...