• Home
  • National
  • Schools in the country are expected to start after July 15, the Centre's guidelines will be released soon

नवी दिल्ली / देशात शाळा 15 जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता, केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर होणार

  • देशात शाळा 15 जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता, केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर होणार

दिव्य मराठी

May 22,2020 07:50:00 AM IST

नवी दिल्ली. (अमितकुमार निरंजन)

काेराेना संकटामुळे गेल्या मार्चपासून बंद असलेल्या शाळा १५ जुलैनंतर सुरू हाेण्याची शक्यता आहे. यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. प्रत्येक दिवशी ३३ % किंवा ५५ % विद्यार्थीच शाळेत जाऊ शकतील. किती मुलांना शाळेत बाेलवायचे याचा निर्णय राज्य सरकार व शाळा प्रशासन घेईल, असे सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार हात धुण्याची व्यवस्था, शाैचालय, पिण्याच्या पाण्याचे नळ यांचे प्रमाण वाढवावे लागू शकते. ५० % विद्यार्थ्यांच्या फाॅर्म्युल्याची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांना आठवड्यातून तीनदा आणि ३३ % फाॅर्म्युला लागू करणाऱ्या शाळांमध्ये आठवड्यातून दाेन दिवसच मुले शाळेत जाऊ शकतील. उर्वरित अभ्यासक्रम आॅनलाइन शिकवला जाईल. कोरोना संसर्गाची स्थिती पाहून जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये याचा आढावा घेण्यात येईल. या आधारावर शाळा सुरू करण्याच्या तारखेमध्येही बदल हाेऊ शकताे. सरकारने १ ते १५ जुलैदरम्यान सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याची घाेषणा केली हाेती.

अॅक्शन कमिटी आॅफ अनएडेड रिकग्नाइझ्ड प्रायव्हेट स्कूल्स या खासगी शाळांच्या संघटनेचे महासचिव भरत अरोरा म्हणाले, मार्गदर्शक तत्त्वे जाहीर हाेताच आम्ही आमचे एसआेपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करू. सॅनिटायझेशन आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या व्यवस्थेमुळे खर्चात वाढ हाेणार आहे. शेल्टर हाऊस किंवा क्वॉरंटाइन सेंटर म्हणून असलेल्या सध्याच्या शाळा या शाळा सुरू हाेण्याच्या अगाेदर रिकाम्या कराव्या लागतील.

विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण

दाेन आठवड्यांपर्यंत शिक्षक व कर्मचाऱ्यांना फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनचे प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांनाही माहिती देण्यात येईल. प्रत्येक वर्गासाठी शाैचालय व पिण्याच्या पाण्यासाठी निश्चित जागा असेल. दुसरे विद्यार्थी तेथे येऊ शकणार नाहीत. त्यामुळे वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला संसर्ग झाला तर फक्त त्याच वर्गातील विद्यार्थ्यांना क्वॉरंटाइन करावे लागेल. सामूहिक खेळ बंद ठेवण्यात येतील.

X