आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Schools Will Have Clusters; Teachers, There Will Be Exchange Of Resources, Online Education Will Increase

नवे शैक्षणिक धोरण:शाळांचे असतील क्लस्टर; शिक्षक, संसाधनांचेही होईल आदान-प्रदान, ऑनलाइन शिक्षण वाढेल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एखाद्या भागातील मोठी माध्यमिक शाळा जवळील लहान शाळांचे असेल मुख्यालय

केंद्राने ३४ वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण आखले. यात बहुतांश बाबी अजून स्पष्ट नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या काही शंका आहेत. तज्ज्ञांनी सोप्या पद्धतीने असे समजावून सांगितले हे धोरण...

नव्या शैक्षणिक धोरणात सरकारी शाळांतील प्रशासनात मोठा बदल करण्यात आला आहे. आता कॉम्ेप्लेक्स किंवा क्लस्टरच्या धर्तीवर शाळांचे व्यवस्थापन होईल. हे क्लस्टर शालेय शिक्षण प्रशासनातील मुख्य शाखा असेल. या शालेय कॉम्प्लेक्समध्ये जवळ असलेल्या लहान शाळा संघटनात्मक व प्रशासकीय शाखांच्या स्वरूपात एकत्र असतील. एक माध्यमिक शाळा या रचनेत प्रमुख असेल. या भागातील सर्व सरकारी शाळा केंद्राच्या अंतर्गत येतील. यामुळे संसाधनांचे आदान-प्रदान करणे सुलभ होऊ शकेल. एकच व्यवस्थापन असल्याने या शाळांत ग्रंथालय, प्रयोगशाळा, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक आणि विशेष विषयांचे शिक्षक यांसारखी संसाधनांचे आदान-प्रदान होऊ शकेल. याशिवाय देशभरात एक सरकारी आणि एक खासगी शाळा जोडण्याचा उल्लेखही धोरणात आहे. शाळांत मोफत असलेल्या मूलभूत सुविधांचा वापर सामाजिक जागृती केंद्रांच्या स्वरूपात करण्याबाबतचा उल्लेखही धोरणात आहे.

ऑनलाइन शिक्षण वाढेल
ई-शिक्षणासाठी शिक्षण मंत्रालयात एक विभाग असेल. यातून डिजिटल पायाभूत रचना, यातील कंटेंट आणि क्षमता वाढेल.
- नवीन धोरण कधीपासून लागू? पॅटर्न अचानक बदलला जाईल का?
हा शैक्षणिक पॅटर्न एकदम बदलणार नाही. एका दशकात यात हळूहळू बदल करण्यात येईल. उदा. १०वी परीक्षेचा नवा पॅटर्न २०२२-२३ पर्यंत येईल. २०२४-२५ मध्ये १२वीचा पॅटर्न अभ्यासक्रमात दाखल होईल. पूर्व प्राथमिक आणि पहिली इयत्तेसाठी ३ महिन्यांचे पूर्वतयारीसाठीचे मॉड्यूल पुढील शैक्षणिक सत्रात, म्हणजे २०२१-२२ मध्ये लागू होऊ शकेल. २०२३-२४ मध्ये ३ वर्षांची मुले अंगणवाडीत दाखल व्हावीत, याकडे प्रशासनाच्या वतीने प्राधान्यक्रमाने लक्ष दिले जाईल.

- वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाचा कालावधी किंवा पॅटर्न बदलेल?
यात काहीही बदल होणार नाही. परंतु, इंटर्नशिप मात्र कठीण होईल. कारण, नवीन धोरणात प्रामुख्याने व्यावहारिक ज्ञानावर लक्ष असणार आहे. यामुळे डॉक्टरांचे प्रायोगिक ज्ञान (प्रॅक्टिकल) आणखी वाढेल. याचप्रमाणे जेईई व इतर अभ्यासक्रमांत अशा प्रायोगिक ज्ञानांवरच लक्ष केंद्रित असेल. यामुळे रोजगार संधी वाढतील.

- बोर्डाची परीक्षा पद्धत बंद होईल?
परीक्षा होत राहतील. मात्र, मूल्यांकनाचे स्वरूप बदलेल. तिसरी, पाचवी आणि आठवीतील सर्व मुलांची परीक्षा होईल. १०वी तसेच १२वीच्या बोर्डाच्या परीक्षाही सुरूच राहतील. परंतु, मूल्यांकनाचे निकष ठरवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘परख’ हे नवीन केंद्र स्थापन केले जाणार आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यास एक वर्ष लागेल. २०२२-२३च्या सत्रापर्यंत शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

एक्स्पर्ट पॅनल
- व्ही. रामगोपाल राव, डायरेक्टर, आयआयटी दिल्ली
- प्रो. टी.व्ही. कट्टिमनी,
- प्रो. एम. के. श्रीधर, धोरण आखणी समिती सदस्य
- शोभा मिश्रा घोष, असिस्टंट सेक्रेटरी जनरल, फिक्की