आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Scientists Have Created 100 Percent Natural Color For Hair With Bacteria Found In The Soil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉझिटिव्ह रिसर्च:मातीत आढळणाऱ्या जिवाणूद्वारे शास्त्रज्ञांनी केसांसाठी बनवला १०० टक्के नैसर्गिक रंग, साइड इफेक्टही नाही

चंदीगड / ननू जोगिंदर सिंह4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाब विद्यापीठाच्या संशोधकांच्या 7 वर्षांच्या परिश्रमानंतर पेटंट दाखल

कमी वयात केस पांढरे होणे सामान्य आहे. डाय केल्यानंतर रसायनामुळे केस गळणे, राहिलेले केसही वेळेआधीच पांढरे होणे सुरू होते. अशा समस्येने त्रस्त लोकांसाठी पंजाब विद्यापीठाच्या संशोधकांनी केसांसाठी १०० टक्के नैसर्गिक रंग तयार केला आहे. विशेष म्हणजे तो मातीत आढळणाऱ्या जिवाणूद्वारे तयार करण्यात आला असून त्याचा कोणताही साइड इफेक्ट दिसून आला नाही. विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी जिवाणू वेगळा करून रंग तयार केला आहे. सुमारे सात वर्षांपासून यावर काम सुरू होते व आता पेटंट दाखल केले आहे. प्रा. नवीन गुप्ता ‘केमिकल फ्री यूजर फ्रेंडली हेअर डाइंग फॉर्म्युलेशन’चे संशोधक आहेत. त्यांना विद्यार्थी डॉ. दीपककुमार, राहुल वरमुटा व सहसंशोधक प्रिन्स शर्मा यांनी मदत केली. प्रा. गुप्ता यांनी सांगितले की, हेअर डाय करताना एक रंग असतो व एक डेव्हलपर. दोघांमध्ये रसायनाचा वापर होतो.

डेव्हलपरमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर होतो, तर केसांना रंगवण्यासाठी अमोनियाचा वापर होतो. अमोनियाचा पर्याय तर उपलब्ध आहे, मात्र इतर गोष्टींना नाही. दरम्यान, जिवाणूवरील एका संशोधनात त्यांनी वाचले की तो अल्काइन आहे. या क्षेत्रातील संशोधनात समजले की, यातून बनवलेल्या रंगात हायड्रोजन पॅरॉक्साइड टाकण्याची गरज नसणार. सलूनमधून केस घेऊन त्यांनी त्यावर प्रयोगशाळेत प्रयोग केला. प्रयोगशाळेत तो १५-२० वेळा धुतल्यानंतरही टिकला तर सामान्य स्थितीतही जास्त टिकण्याची शक्यता आहे.

डॉ. गुप्ता यांनी याआधी केले आहे पाण्यावर संशोधन
नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कच्या क्रमवारीत आयआयटीनंतर पंजाब विद्यापीठाचा क्रमांक असतो. अशा प्रकारच्या क्रमवारीत सर्वाधिक गुण संशोधनासाठीच मिळतात. दुसरी एक खासगी जागतिक शैक्षणिक क्रमवारी २०२१ नुसार पंजाब विद्यापीठ देशात चौथ्या क्रमांकावर आहे. संशोधक डॉ. नवीन गुप्ता यांनी सुखना तलावात सांडपाणी सोडल्यानंतर येणारी दुर्गंधी तसेच चंदीगडच्या अनेक समस्यांवर तोडगा काढला आहे.

बातम्या आणखी आहेत...