आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत बिलावल भुट्टो यांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, दहशतवाद हा जगासाठी मोठा धोका आहे. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय होऊ शकत नाही.
जयशंकर म्हणाले की, दहशतवादाचा प्रत्येक स्वरूपात सामना करून तो कोणत्याही परिस्थितीत थांबवला पाहिजे. सीमेपलीकडील दहशतवाद थांबवणेही गरजेचे आहे. दहशतवादाशी लढा हे SCO चे खरे उद्दिष्ट आहे. तत्पूर्वी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. यादरम्यान एस जयशंकर आणि बिलावल यांनी हस्तांदोलन टाळले, हात जोडून एकमेकांना नमस्कार केला.
या बैठकीला पाकिस्तान व्यतिरिक्त चीन, रशियासह सर्व सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत. त्याच वेळी, गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. भारताची पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही.
गुरुवारी बिलावल भुट्टो यांनी एका व्हिडिओद्वारे, SCO बैठकीत आपली चीन व उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय ते भारतात 2 मुलाखतीही देणार आहेत.
SCO बैठकीशी संबंधित फोटो पाहा...
पाक परराष्ट्र मंत्री 12 वर्षांनंतर भारतात
एससीओ बैठकीसाठी पाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोही गोव्यात पोहोचलेत. तब्बल 12 वर्षांनंतर भारताला भेट देणारे ते पाकचे पहिले परराष्ट्र मंत्री आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाक तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार भारत दौऱ्यावर आल्या होत्या.
भारतात पोहोचल्यानंतर बिलावल म्हणाले - गोव्यात येऊन खूप आनंद झाला. मला विश्वास आहे की, SCO बैठक यशस्वी होईल. तत्पूर्वी पाक सोडताना ते म्हणाले होते - या बैठकीत सहभागी होण्याचा माझा निर्णय पाकसाठी एससीओ किती महत्त्वाचा आहे हे दर्शविते. मी सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे.
SCO बैठकीशी संबंधित अपडेट्स...
SCO संरक्षण मंत्र्यांची 27-28 एप्रिल रोजी बैठक झाली
गत 27-28 एप्रिल रोजी नवी दिल्लीत SCO संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीनचे संरक्षण मंत्री भारतात आले होते. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर कोणत्याही चिनी मंत्र्याची ही पहिलीच भारत भेट होती.
15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचेही यात 38 चिनी सैनिक मारले गेले. पण चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अद्याप याची पुष्टी केली नाही. त्यांनी आपले केवळ 4 सैनिक मारले गेल्याचा दावा केला. तब्बल 3 तास ही चकमक सुरू होती.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी सीमेवरील शांततेवर भाष्य करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले - दोन्ही देशांतील कराराच्या उल्लंघनामुळे द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण आधारच नष्ट झाला आहे. LAC शी संबंधित सर्व समस्या द्विपक्षीय करारांनुसार सोडवण्याची गरज आहे. चीनशिवाय त्यांनी अन्य काही देशांच्या संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेतली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.