आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय भारत स्काउट गाइड उत्सव:स्काऊट्स गाइडचे स्मार्ट टेंट गाव, 9 महिन्यांत वसवले

अरविंद शर्मा, पालीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमध्ये ६६ वर्षांनंतर दुसऱ्यांदा राष्ट्रीय भारत स्काउट गाइड उत्सव ४ ते १० जानेवारीदरम्यान पालीत होत आहे. त्यासाठी स्मार्ट गाव वसवले आहे. हे तंबूंचे गाव वसवण्यासाठी ९ महिने लागले आणि ते २२० हेक्टरमध्ये विस्तारले आहे. हे आतापर्यंत झालेल्या १७ उत्सवात सर्वात भिन्न आणि सर्वात मोठे आहे. गाव पूर्णपणे स्मार्ट आहे. प्रत्येक कोना वायफाय इंटरनेट आणि हाॅटलाइनने जोडला आहे. गाव वसवण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च आला आहे. ४ लाख लाकडी दांड्यापासून तयार केलेल्या या गावात ३६०० टेंट आहेत. या घरांत बेडरूम, स्मार्ट वॉशरूम व गेस्ट रूम आहे. येथे पाच हेलिपॅडही बनवण्यात आले आहेत. 300 विदेशी आणि देशातील ३५ हजार स्काऊट्स भाग घेतील. 25 हजार स्काऊट राष्ट्रपतींसमोर समूह थीम साँग गाऊन विश्वविक्रम करतील.

बातम्या आणखी आहेत...