आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sea Water From SriLanka And Kailash Mansarao For Bhumi Pujan Ritual Of Ram Temple

अयोध्येत नवे पर्व:राम मंदिराच्या भूमिपूजन विधीसाठी कैलास मानसराेवरासह लंकेतील समुद्राचे पाणी

विजय उपाध्याय | अयोध्या3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्येत भूमिपूजनाआधी रस्त्यांची साफसफाई करताना कर्मचारी. - Divya Marathi
अयोध्येत भूमिपूजनाआधी रस्त्यांची साफसफाई करताना कर्मचारी.
  • अयोध्येत नवे पर्व, 5 ऑगस्टच्या सोहळ्याची जय्यत तयारी

अयाेध्येत ५ ऑगस्टला हाेणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ट्रस्टने याचे पहिले निमंत्रण श्री रामलल्ला विराजमानचे चार बंधू व बाल हनुमानाला दिले. रविवारी दुपारी मंदिरात पत्रिका अर्पण करून देवाला उपस्थित राहण्याची आणि संपूर्ण साेहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र माेदी अयाेध्येत आल्यानंतर सर्वप्रथम हनुमानगढीचे दर्शन घेतील. पंतप्रधान ५ ऑगस्टच्या कार्यक्रमात अडीच तास थांबतील. १७० ते १८० जण या साेहळ्याला उपस्थित राहतील.

नवरत्नजडित हिरव्या रंगाच्या पेहरावात दिसतील

रामलल्लांसाठी दाेन पाेशाख बनवलेे आहेत. या दिवशी रामलल्लांना हिरवे व केशरी रंगाचे नवरत्नजडित वस्त्र घातले जातील. रामा दलचे अध्यक्ष पंडित कल्किराम यांनी रामलल्लांचे चार पाेशाख मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास यांच्याकडे सोपवले. सोमवारसाठी पांढरा, मंगळवारी लाल व बुधवारी हिरव्या रंगाचा विशेष पाेशाख बनवला आहे.