आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हेरियंट:कोरोना विषाणूचे धोकादायकम्युटेशन दिसेल तो भाग सील करून वेगळी रणनीती आखा

नवी दिल्ली(पवनकुमार )एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैज्ञानिकांचे मत- नव्या व्हेरियंटची निगराणी आवश्यक

संपूर्ण जगासाठी आज कोरोना विषाणूचा भारतीय व्हेरियंट (B.1.617) चिंतेचा विषय मानला जात आहे. विषाणूचे म्युटेशन आणि नवा व्हेरियंट बनणे हे सामान्य आहे. वैज्ञानिकांच्या मते, कोरोना विषाणूत होत असलेल्या म्युटेशनवर व्हायरॉलॉजिस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग करणाऱ्यांव्यतिरिक्त आरोग्य क्षेत्रातील लोकांनाही लक्ष ठेवावे लागेल. कोणत्या भागातून घेतलेल्या नमुन्यांच्या सिक्वेन्सिंगमध्ये धोकादायक म्युटेशन दिसले, याकडे सरकारने जास्त लक्ष द्यावे म्हणजे त्या भागासाठी विशेष रणनीती बनवता येऊ शकेल आणि विषाणू त्या भागापुरताच मर्यादित ठेवता येऊ शकेल. इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बॅलियरी सायन्सेसच्या प्रा. एकता गुप्तांच्या मते, जेवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण येत आहेत ते पाहता मोठ्या संख्येत नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग आवश्यक आहे. कोणते म्युटेशन गंभीर होऊ शकते याच्या तपासणीत ४-५ महिन्यांचा वेळ जात आहे. ते वेगाने व्हावे. प्रत्येक भागाच्या नमुन्यांचे त्याच भागाच्या लॅबमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग व्हावे.

भारताची लोकसंख्या जास्त... येथे म्युटेशनही जास्त होतील
कोविड-१९ वरील आयसीएमआर टास्क फोर्सचे सदस्य प्रा. डॉ. एन. के. अरोरा यांच्या मते, विषाणू जेवढ्या जास्त लोकांत फिरेल, तेवढे जास्त म्युटेशन होईल. भारतात जास्त रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे म्युटेशनही जास्त असेल. फण प्रत्येक म्युटेशन महत्त्वाचे नाही, कारण बहुतांश म्युटेशन आपोआप संपतात. गंभीर म्युटेशन एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत असेल तर प्रकरण गंभीर आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजितकुमार सिंह यांनी सांगितले की,दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार व्हेरियंट ५०% जास्त संक्रामक आणि आजारात गंभीरता निर्माण करणारा आहे, पण आता त्यात घट होत असल्याचे दिसते.

कॉपी बनवताना दरवेळी विषाणू स्वत:ला बदलतोय...हेच म्युटेशन
विषाणू मानवी शरीरात स्वत:ची कॉपी तयार करून संख्या वाढवत जातो. प्रत्येक नवी कॉपी मूळ विषाणूपेक्षा थोडी वेगळी असते. याच बदलाला म्युटेशन म्हटले जाते. शरीराच्या प्रतिरोधक क्षमतेवर जे म्युटेशन जास्त वरचढ ठरते तेच वाढते. ही व्यक्ती दुसऱ्याला नव्या म्युटेशनने संक्रमित करते. हे बदल विषाणूच्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्येच दिसतात. विषाणूचे स्वरूप समजणे आणि त्यावर नियंत्रण मिळ‌वण्यासाठी बदल समजणे गरजेचे आहे.

३ मुद्द्यांद्वारे जाणून घेऊ म्युटेशनचे गांभीर्य
1. हे म्युटेशन आजार जास्त गंभीर करत आहे का?

2.हे म्युटेशन किती संक्रामक आहे, म्हणजे ते किती वेगाने पसरत आहे?

3.म्युटेशनवर कोरोना लस गुणकारी आहे का?

आतापर्यंत भारतात 18,353 नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यात 3000 पेक्षा जास्त म्युटेशन आढळले. जगभरात आतापर्यंत 13.38 लाखांपेक्षा जास्त म्युटेशन आढळले.

बातम्या आणखी आहेत...