आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Search For Jammu And Kashmir Rohingya Begins, 155 Dispatched To Camp, Operation After Terrorist Encounter In Sunjwa

ग्राउंड रिपोर्ट:जम्मूत रोहिंग्याचा शोध सुरू, 155 जणांची छावणीत केली रवानगी,  सुंजवामध्ये दहशतवादी चकमकीनंतर मोहीम

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मूत भठिंडीच्या किरयानी तलाव व सुंजवा परिसरात वास्तव्याला असलेल्या रोहिंग्या परिवारांची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे. पोलिसांच्या या शोध मोहिमेला वेग आल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तोंडावर सुंजवामध्ये जैश-ए-मोहंमदच्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. तेव्हा दहशतवाद्यांच्या साथीदारांची धरपकड करण्यासाठी विशेष अभियान चालवण्यात आले होते. त्यामध्ये बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्याशिवाय प्रशासन जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या आदेशानुसार रोहिंग्या परिवारांची माहिती संकलित करत आहे. जम्मूमध्ये बेकायदा राहणाऱ्या १५५ स्थलांतरित नागरिकांकडे वैध कागदपत्रे आढळली नाहीत. तेव्हापासून त्यांना हिरानगर येथील छावणीत ठेवण्यात आले आहे. किरयानी तलाव भागातील रोहिंग्या वस्तीमध्ये अनेक दिवसांपासून राहणारे दीन मोहंमद म्हणाले, संयुक्त राष्ट्राचे स्थलांतरित कार्ड असूनही रोहिंग्या परिवारांना त्रास दिला जात आहे. एका मदरशात अध्यापन करणारे मोहंमद म्हणाले, मी पंधरा वर्षांपासून जम्मूमध्ये राहतो. आता लोक पोलिसांच्या भीतीने जात आहेत.

सुप्रीम कोर्ट - देशातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करावी
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच रोहिंग्यांना देशातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. विविध याचिकांवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय म्हणाले, देशात बेकायदा राहणाऱ्यांना नागरिक म्हटले जाऊ शकत नाही. रोहिंग्यांच्या बाबतीत देखील असेच आहे. सरकारने बेकायदा राहणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू करावी. त्यासाठी इतर बाजूही तपासल्या पाहिजेत. कायदेशीर प्रक्रिया राबवावी.

6523 रोहिंगे जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यात वास्तव्यास. गृह विभागानुसार ३९ छावण्या. 40 हजारांहून जास्त रोहिंगे भारताच्या विविध भागांत वास्तव्यास. हैदराबाद, दिल्लीत जास्त.

170 रोहिंग्यांना भारत सरकारने निर्वासित करण्याचे आदेश दिले आहेत. रवानगी ठरली.

बांगलादेश - २१ किमी दूर बेटावर वसवले, तेथून पळ
म्यानमारहून आलेल्या रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये सर्वात आधी स्थलांतर केले. कॉक्स बाजार भागातील छावण्यांत सुमारे ११ लाख रोहिंग्यांपैकी १ लाख स्थलांतरितांच्या व्यवस्थेसाठी एका बेटावर २६८८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. कॉक्स बाजार म्यानमारच्या रखैन प्रांताजवळ आहे. २०१७ मध्ये बांगलादेशने मुख्य भूमीपासून २१ किलोमीटरवर एका बेटावर १७०० रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली होती. परंतु तेथून काही रोहिंग्यांनी पळ काढला. आम्हाला कुटुंबापासून दूर ठेवले जात आहे, असे रोहिंग्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय बेट सुरक्षित नसल्याचीही त्यांची तक्रार आहे.
1 हजार रोहिंगे परिवार रोज बोटी व इतर मार्गे प्रवास करून बांगलादेश गाठतात. त्यांना वसवण्याचे आव्हान आहे.
11 लाखांहून जास्त रोहिंगे आतापर्यंत बांगलादेशमध्ये घुसले आहेत. गुन्हेगारी प्रकरणांतही ते सामील.

बातम्या आणखी आहेत...