आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध:सीट बेल्ट अलार्म स्टॉपर ऑनलाइन विकणार नाही; सीसीपीएचा आदेश जारी

दिव्य मराठी नेटवर्क | दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर आता देशात ऑनलाइन विकले जाणार नाहीत. सीसीपीएने(सेंट्रल कन्झूमर प्रोटेक्शन अथॉरिटी) ५ ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि मेशोना आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे त्वरित काढण्यास सांगितले आहे. यासोबत सांगितले की, ज्या उत्पादनात लोकांची सुरक्षितता धोकात येऊ शकते,ती त्वरीत हटवली जावीत.

यानंतर १३,११८ उत्पादने काढण्यात आली आहेत. सीसीपीएने सांगितले की, आम्ही सुरक्षेशी तडजोड करू शकत नाहीत. कार सीटबेल्ट अलार्म स्टॉपर सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास अलार्म बंद करतो.

CCPA मुख्य आयुक्त निधी खरे यांनी पाच मुख्य ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध आदेश जारी केला आहे. या कंपन्यांमध्ये Amazon, Flipkart, Snapdeal, ShopClues आणि Meesho यांचा समावेश आहे. त्यांना ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि अनुचित व्यापार प्रथेचा आदेश देण्यात आला आहे.