आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Second Phase Of Polling । Electronic Voting Machines Found । BJP Candidate’s Car In Assam । Priyanka Gandhi Attacked EC​​​​​​​ News And Updates

भाजप नेत्याच्या गाडीमध्ये EVM:निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना केले सस्पेंड, प्रियांका गांधी म्हणाल्या, अशा घटना वाढत आहेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाथरकांडी येथील भाजप उमेदवार अतानू भुयन यांच्या गाडीत ईव्हीएम मशीन आढळली होती.

आसाम विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वादाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये निवडणूक अधिकारी कारमध्ये EVM घेऊन जाताना दिसत आहेत आणि ही कार भाजप नेत्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड केले आहे.

प्रियंका गांधी यांनी भाजपवर प्रश्न उपस्थित केले
काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून म्हटले आहे की, अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत आणि इलेक्शन कमिशनने (EC) यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. आसाममध्ये 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. 39 जागांसाठी 74.64% मतदान झाले. पहिल्या टप्प्यात येथे 72.14% मतदान झाले होते.

EC च्या गाडीत बिघाड
वृत्तसंस्था एनआयएच्या हवाल्यानुसार, पाथरकांडी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक लोकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवले होते. लोकांचे म्हणणे होते की, ही गाडी निवडणूक आयोगाची नव्हती. परंतु, सुत्रांच्या माहितीनुसार, EC च्या गाडीत बिघाड झाल्यामुळे जवळून जाणाऱ्या गाडीला त्यांनी लिफ्ट मागितली होती. दरम्यान ती गाडी एका भाजप उमेवाराची असून यावरदेखील जमावांकडून हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम मशीन सुरक्षित असून त्यासोबत कोणतीच छेडछाड झाली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...