आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतच असताना मंगळवारी दिवसभरात २८,८६९ नवे रुग्ण आढळले. हा यंदाचा उच्चांक आहे. यापूर्वी गेल्या १५ जुलैला इतके रुग्ण सापडले आहे. यासोबतच देशात कोरोनाचे एकूण रुग्ण १ कोटी १४ लाख ३८,४६४ वर पोहोचले आहेत. यापैकी १ लाख ५९, ०७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना एक पत्र लिहिले आहे. यात गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाच्या हवाल्याने म्हटले आहे की, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. यामुळे येथे कोरोनाविरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, वैद्यकीय तपासणी, ट्रॅकिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंगची गरज आहे.
अहमदाबाद, सुरत, बडोदा व राजकोटमध्ये रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असेल. भोपाळ व इंदुरातही रात्री संचारबंदी सुरू होत आहे.
रुग्णाच्या संपर्कातील २०-३० जणांना शोधून क्वॉरंटाइन करा : केंद्र
1. केंद्रानुसार, महाराष्ट्रात संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रारंभ झाला आहे. बस स्थानके, रेल्वे स्टेशनवर रॅट (आरएटी) किटद्वारे चाचण्या कराव्या. ७०% आरटी-पीसीआर आणि ३०% अँटिजन टेस्ट कराव्या. 2. कोविड रुग्णाच्या संपर्कातील किमान २० ते ३० लोकांना शोधून त्यांना क्वॉरंटाइन करा. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांची देखरेख बंद करणे योग्य नाही. 3. रुग्णाच्या संपर्कात आल्यापासून ५ ते १० दिवसांनंतर काेरोनाच्या चाचण्या कराव्यात. ८० ते ८५% रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची गरज आहे.
नागपुरात झपाट्याने वाढत आहेत कोरोना रुग्ण
नागपुरातही कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार 1921 नवी प्रकरणे सोमवारी समोर आली होती. 873 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. तर 17 जणांचा मृत्यू झाला होता. येथे सरासरी रोज दोन हजार नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत.
केंद्राने महाराष्ट्राला २.२० कोटी डोस पुरवावेत : आरोग्यमंत्री टोपे
राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीचे २.२० कोटी डोस पुरवावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात टोपे यांनी नमूद केले आहे की, आठवड्याला २० लाख डोस पुरवावेत. राज्यात ४५ वर्षांवरील आजारी लोक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डोस देण्यासाठी येत्या साडेतीन महिन्यांत २.२० कोटी डोसची गरज पडेल.
राज्य सरकारच्या उपाययोजना
महाराष्ट्र सरकारने सोमवारी दिशानिर्देश जारी केले. कंटेनमेंट झोनमधील सर्व निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले. लग्नसोहळ्यात ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना राहता येणार नाही. अंत्यसंस्कारालाही २० जणांची मर्यादा आहे. हॉटेल आणि कार्यालयांत ५० टक्के क्षमतेनेच काम करण्याची परवानगी आहे.
भाविकांना परवानगी नाही
कोरोनामुळे शीख भाविकांना फेब्रुवारीत पाकिस्तानातील ननकाना साहिबला जाण्याची परवानगी दिली नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डींनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सीमेवर वाहतुकीस बंदी असल्याने जथ्थ्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
4. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हिटी दरही वाढला आहे. दर १०० चाचण्यांत मुंबईत ५.१% तर औरंगाबादेत ३०% रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. हजारो लोकांच्या चाचण्याच न झाल्याने मोठ्या सामुदायिक संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. 5. अल्प प्रमाणात काँटॅक्ट ट्रेसिंग आणि लक्षणे नसलेल्या आणि पूर्वलक्षणे असलेल्यांची माेठी आहे. मात्र त्यांना त्यांचे ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगच करण्यात आलेले नाही. हाय रिस्क काँटॅक्टचे ट्रॅकिंग नाही.
अंशत: नाइट कर्फ्यू : वीकेंड लॉकडाऊन कुचकामी
केंद्रीय पथकानुसार, राज्यात अनेक ठिकाणी रात्रीची संचारबंदी, अंशत: लॉकडाऊन, शनिवार-रविवारचा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, वाढत्या संसर्गापुढे हे उपाय फार तोकडे आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने आधीच सुचवलेल्या कंटेनमेंट झोनच्या रणनीतीचा अवलंब करावा. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरची व्यवस्था पुन्हा लागू करावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.