आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Second Wave Of Corona Infestation In European Countries After China, India Awaits Corona High

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा दुसरा टप्पा:चीननंतर कोरोनाचे केंद्र ठरलेल्या युरोपीय देशांत संसर्गाची दुसरी लाट, भारतात कोरोना उच्चांकाची प्रतीक्षा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या टप्प्याची कारणे : क्लबमधील पार्ट्या, समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी, निर्बंधांविरोधातील आंदोलन

चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक विळखा पडलेल्या स्पेन आणि फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ब्रिटन, इटली आणि जर्मनीमध्येही नवीन रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. या देशांमध्ये संसर्गाचा उच्चांक पाच महिन्यांपूर्वीच आला होता. यानंतर हे देश कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने जात असताना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या देशांमध्ये मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे. उदाहरणार्थ स्पेनमध्ये २८ ऑगस्टला पाच महिन्यांनंतर ७,३७९ नवे रुग्ण आढ‌ळले तर २५ मृत्यू झाले. मार्चमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असताना मृत्यूंची संख्याही ८०० पेक्षा जास्त होती.

फ्रान्स : ३ महिन्यांत १८८७ मृत्यू, आधी ३ महिन्यांत २८,६८७ मृत्यू झाले होते

फ्रान्समध्ये गत १० दिवसांत दिवसाला सरासरी ४,५८० रुग्ण आढळले. सरासरी १४ मृत्यू झाले. यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय रद्द केला.

स्पेन: सध्याचा मृत्युदर 0.6%, सध्या दिवसाला आढळताहेत ६ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

मागील ७ दिवसांत रोज ४३,७४७ रुग्ण आढळले. हा मार्चच्या तुलनेत सर्वात मोठा आकडा आहे. मार्चमध्ये एका आठवड्यात ५५०० मृत्यू झाले होेते. तर आता २७८ मृत्यू झाले.

ब्रिटन: ७ दिवसांत ५९ मृत्यू, मार्चमध्ये ७ दिवसांत ६२५७ मृत्यू

इटली: ७ दिवसांत ५४ मृत्यू, तर ८२८७ रुग्ण आढळले

जर्मनी: ७ दिवसांत ३१ मृत्यू, तर ९०९३ रुग्ण वाढले

परिणाम : ब्रिटन पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत

ब्रिटनमध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक शनिवारी म्हणाले, ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट हा मोठा धोका ठरत आहे. अशा वेळी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थिती अशीच राहिल्यास आम्हाला कडक लॉकडाऊन लावावा लागेल.

> फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. पॅरिसमध्ये अधिक धोका आहे. मास्क न लावणाऱ्यांना तुरुंगात टाकावे लागू शकते.

> स्पेनचे पंतप्रधान पॅड्रो सांचेज म्हणाले, आम्ही पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या विचारात नाही.

> जर्मनीतील बर्लिनमध्ये निर्बंधांविरोधात १८,००० लोकांचे आंदोलन, सरकारने मोर्चांवर बंदी घातली, मात्र कोर्टाने परवानगी दिली.