आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sectarianism Can Be Eradicated By Following The Sarvodayi Message Of Lord Mahavira

महावीर जयंतीनिमित्त संदेश:भगवान महावीरांच्या सर्वोदयी संदेशाच्या पालनाने संप्रदायवाद नष्ट होणे शक्य

राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदी महाराज | णमोकार तीर्थ (जि. नाशिक)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ या भावनेतून महावीरांनी अहिंसेचा उपदेश दिला. मानवासह प्राणिरक्षणाचा उपदेश दिला. आज जगात ज्या काही समस्या आहेत त्यावर उपाय महावीरांच्या अहिंसेमध्ये आहे. कोरोना काळात महावीरांच्या ‘जिओ और जीने दो ’ संदेशाची स्पष्टता झाली. या काळात मास्क वापर, दो गज की दूरी हा संदेश महावीरांच्या संदेशातीलच आहे.

आज जग हिंसेच्या आगीत जळत आहे. ताजे उदाहरण युक्रेन आणि रशिया युद्ध आहे. या युद्धात जीवित व वित्तहानी झाली. जग आतंकवाद, संप्रदायवादाच्या समस्याला सामोरे जात आहे. संप्रदायवादास नष्ट करण्यासाठी अहिंसेची आवश्यकता आहे. सर्वधर्मसमभाव आणि जातीय सहिष्णुता आपल्या मनात आणावी लागेल. आपापसात भांडण करा असे धर्म शिकवत नाही. मैत्रभाव ठेवून समाजात शांततचे वातावरण निर्माण करू शकतो. नुकतीच झालेली हिंसा सांप्रदायिकतेचे प्रतीक आहे. हे नष्ट करायचे असेल तर भगवान महावीरांच्या सर्वोदयी संदेशाचे पालन करावे लागेल. जातपात, रागद्वेष आणि मोह यांचा त्याग करणे आवश्यक आहे. पाच पापांपासून वाचण्यासाठी मनाची शुद्धता, अहिंसा, दया व धर्मपालनावर जोर दिला पाहिजे. भगवान महावीरांनी सांगितलेले ‘अहिंसा परमो धर्म, यतो धर्म तथो जया’ हे सूत्र सर्व प्राण्यांना सुख पोहोचवणारे आहे. सोलापूर व परिसरातील सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा. सोलापुरात सुखशांतीचा संदेश कायम राहो. अहिंसेच्या मार्गाने सर्वांनी चालावे. यात विश्वशांती आहे.

भगवान महावीर २४ वे तीर्थंकर भगवान महावीर जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर होते. भगवान आदिनाथ ते महावीरांपर्यंत २४ तीर्थंकरांनी जैन धर्माच्या महत्त्वपूर्ण सिद्धांताची स्तुती केली. भगवान महावीर हिंसा, अराजकता, नारी अत्याचार आणि बलिपूजा नावावर होणारी पशुहिंसा थांबवणारे पहिले तीर्थंकर होते. महावीरांचा जन्म २६२१ वर्षांपूर्वी झाला. ते बिहारच्या कुंदनपूर्वमधील राजा सिद्धार्थ, माता त्रिशलांचे एकमेव पुत्र होते. ते राजेशाही त्यागून, आत्मचिंतन करून जंगलाच्या दिशेने गेले. मुनिदीक्षा धारण केली. १२ वर्षांचे अखंड मौन, तपस्या करून, ज्ञान मिळवले. २० वर्षांपर्यंत देशात विविध भागांत फिरून मानवकल्याणाचा उपदेश दिला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव केंद्र सरकारच्या वतीने १९७५ मध्ये भगवान महावीर स्वामींचा २५०० वा निर्वाण महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात आला. २००१ मध्ये २६०० वा जन्ममहोत्सव साजरा केला गेला. यातून भारतातील सांस्कृतिक संरक्षण, शाकाहार, संप्रदाय सद्भाव, वैचारिक सहिष्णुता पद्धतीचा प्रचार-प्रसार आणि समाजातील दुर्बलांना मदत करण्याच्या योजना आणल्या. भगवान महावीरांनी नवीन धर्म चालवला नाही, नवीन सिद्धांत स्थापन केला.

Âशब्दांकन : चंद्रकांत मिराखोर