आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-कश्मीरमध्ये एन्काउंटर:अवंतीपोराच्या पाम्पोर परिसरात सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरले, 2 दिवसांपूर्वीच मारले 3 दहशतवादी 

अवंतीपोरा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळता सिक्योरिटी फोर्सने सुरू केली शोध मोहिम
  • या महिन्या 10 व्या एन्काउंटर आहे, गेल्या 9 एन्काउंटरमध्ये 28 दहशतवादी मारले गेले

जम्मू-कश्मीरमध्ये अवंतीपोराच्या पाम्पोर परिसरात सुरक्षा दलाचे दहशतवाद्यांशी एन्काउंटर सुरू आहे. दहशतवादी लपले असल्याची माहिती सिक्योरिटी फोर्सेजला मिळाली होती. यानंतर शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. याच काळात दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केली. सुरक्षा दलानी मेच्या अखेरच्या आठवड्यापासून शोध मोहिम हाती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी शोपियांच्या तुर्कवंगम गावात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 

या महिन्यात 28 दहशतवादी ठार 
18 दिवसांमध्ये आज दहावे एन्काउंटर आहे. यापूर्वी 9 एन्काउंटरमध्ये 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून ऑपरेट होत असलेले नार्को-टेरर रॅकेटही पकडण्यात आले. हे रॅकेट दहशतवाद्यांना फंडिंगसाठी मदत करत होते. 

16 दिवसात 9 एन्काउंटर 

1 जून: नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना 3 पाकिस्तान दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले.

 2 जून: पुलवामाच्या त्राल परिसरात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान 

 3 जून: पुलवामाच्या कंगन परिसरात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना ठार केले

5 जून: राजौरी जिल्ह्याच्या कालाकोटमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान 

7 जून: शोपियाच्या रेबन गावात 5 दहशतवादी मारले गेले 

8 जून: शोपियांच्या पिंजोरा परिसरात 4 दहशतवादी ठार

10 जून: शोपियांच्या सुगू परिसरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान 

13 जून: कुलगामच्या निपोरा परिसरात 2 दहशतवादी मारले गेले 

16 जून: शोपियाच्या तुर्कवंगम परिसरात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

बातम्या आणखी आहेत...