आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जम्मू-कश्मीरमध्ये एन्काउंटर:पुलवामाच्या त्राल परिसरात एका दहशतवाद्याला कंठस्नान, सुरक्षा दलाने 24 तासांत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला 

पुलवामाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बारामूला जिल्ह्याच्या सपोर परिसरात गुरुवारी 2 दहशतवादी मारले गेले
  • जम्मू-कश्मीरमध्ये या महिन्यात 15 एन्काउंटर आतापर्यंत 44 दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement
Advertisement

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. अवंतीपोराच्या त्राल परिसरातील चेवा उल्लामध्ये गुरुवारी संध्याकाळपासून एन्काउंटर सुरू होते. दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिक्योरिटी फोर्सेसने शोध मोहिम सुरू केली. यापूर्वी गुरुवारी सकाळी बारामूला जिल्ह्याच्या सोपोर परिसरात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. 

जम्मू-कश्मीरमध्ये या महिन्यात 15 एन्काउंटरमध्ये 44 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांना मदत पुरवणाऱ्यांना पकडण्याचे सत्रही सुरू आहे. बडगामच्या नरबल परिसरात बुधवारी आर्मी आणइ पोलिसांनी कारवाई करुन लष्कर-ए-तोयबाच्या 5 मदतनिसांना अटक केली होती. त्यांच्याजवळ एके-47 रायफल, 28 गोळ्या आणि लष्कर-ए-तोयबाचे 20 पोस्टर मिळाले होते.

बालाकोटमध्ये 3 संशयास्पद पॉकेट सापडले, हेरोइन असल्याचा संशय 
मेंढर पोलिसांनी दब्बीच्या जंगलांमध्ये गुरुवारी हे पॉकेट हस्तगत केले. यावर पोकिस्तानच्या लाहौरच्या एका दुकानाचा पत्ता लिहिलेला आहे. 

Advertisement
0