आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Security Forces Kill 3 Terrorists In Shopian, Jammu & Kashmir Encounter Between Security Forces And Terrorist At Shopian

जम्मू-काश्मिरात एन्काउंटर:शोपियांमध्ये सुरक्षादलाने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 24 तासात 6 दहशतवाद्यांना कंठस्नान, सैन्याने म्हटले - अमरनाथ यात्रेवर निशाणा साधू इच्छितात दहशतवादी 

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी कुलगाममध्येही 3 दहशतवाद्यांचा खात्मा, यामधील एक पाकिस्तान
  • अमरनाथ यात्रा 21 जुलैपासून सुरू होऊन 3 ऑगस्टपर्यंत चालणार

जम्मू-काश्मीरमधील शोपियानच्या अमशिपोरा भागात सुरक्षा दलाने तीन अतिरेकी ठार केले आहेत. दरम्यान एनकाउंटर अद्यापही सुरू आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या इनपुटवर सैन्य आणि पोलिस कर्मचार्‍यांनी शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

24 तासांत सुरक्षा दलाने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यातील नागनाद शिमर भागात जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले, त्यातील एक पाकिस्तानी होता. शुक्रवारी सैन्याने सांगितले की दहशतवादी अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा विचार करीत आहेत, परंतु आपले सैनिक त्यांना यशस्वी होऊ देणार नाहीत. यावर्षी अमरनाथ यात्रा 21 जुलैपासून सुरू होणार असून 3 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या महिन्यात 8 एन्काउंटरमध्ये 17 दहशतवाद्यांचा खात्मा 

तारीखठिकाणमारले गेलेले दहशतवादी
2 जुलैमालबाग (श्रीनगर)1
4 जुलैअर्राह (कुलगाम)2
7 जुलैगोसू (पुलवामा)1
11 जुलैनौगाम (कुपवाड़ा)2
12 जुलैसोपोर (बारामूला)3
13 जुलैश्रीगुफवाड़ा (अनंतनाग)2
17 जुलैनागनाद शिमर (कुलगाम)3
18 जुलैअमशिपोरा (शोपियां)3

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू
पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी रात्री नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार आणि एक जखमी झाला.