आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Security Forces Kill Terrorists In Kulgam Encounter, Seize Several Weapons Including Grenade Launchers In Rajouri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू काश्मीरात एन्काउंटर:कुलगाम येथील चकमकीत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा केला खात्मा, राजौरीमध्ये ग्रेनेड लॉन्चरसह अनेक हत्यार हस्तगत 

श्रीनगर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही, एन्काउंटर जारी
  • जूनमध्ये जवळपास 16 एन्काउंटरमध्ये 51 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याच्या आरा परिसरात शनिवारी दुपारी एन्काउंटरमध्ये सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. सुरक्षादलानुसार ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान अजूनही चकमक सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी यापूर्वी राजौरी जिल्ह्यातील एका गावातील दहशतवादी आड्ड्या उद्धवस्त केला होता. येथे मोठ्या प्रमाणात हत्यार, ग्रेनेड लॉन्चर आणि दारु गोळा सापडला होता. हे सर्व हत्यार हस्तगत करण्यात आले. सुरक्षा दलाने जूनमध्ये एकूण 16 एन्काउंटरमध्ये 51 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

शुक्रवारी एक जवान शहीद झाला

शुक्रवारी जम्मू-कश्मीरच्या राजधानी श्रीनगरच्या मालबाग भागात दहशतवाद्यांकडून एनकाउंटरमध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. सुरक्षादलानेही एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. खात्मा झालेला दहशतवादी हा जाहिद होता, त्याने गेल्या आठवड्यात अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहड़ामध्ये सीआरपीएफ पार्टीवर हल्ला केला होता. त्याच्या फायरिंगमध्ये 6 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता.

जूनमध्ये झालेले एन्काउंटर 

तारीखठिकाणमारले गेलेले दहशतवादी
1 जूननौशेरा3
2 जूनत्राल (पुलवामा)2
3 जूनकंगन (पुलवामा)3
5 जूनकालाकोट (राजौरी)1
7 जूनरेबन (शोपियां)5
8 जूनपिंजोरा (शोपियां)4
10 जूनसुगू (शोपियां)5
13 जूननिपोरा (कुलगाम)2
16 जूनतुर्कवंगम (शोपियां)3
18-19 जूनअवंतीपोरा और शोपियां8
21 जूनशोपियां3
23 जूनबंदजू (पुलवामा)2
25 जूनसोपोर (बारामूला)2
25-26 जूनत्राल (पुलवामा)3
29 जूनखुलचोहर (अनंतनाग)3
30 जूनवाघमा (अनंतनाग)2
एकूण 51
बातम्या आणखी आहेत...