आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Security Forces Kill Three Terrorists In Shopian's Turkwangam Area, 28 Killed In 16 Days

जम्मू-काश्मिरात एन्काउटंर:शोपियांच्या तुर्कवंगम परिसरात सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, 16 दिवसात 28 दहशदवादी ठार 

जम्मू-काश्मीर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या महिन्यात जवळपास 28 दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement
Advertisement

जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील तुर्कवंगम परिसरात सुरक्षा दलाने मंगळवारी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामधील एक हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर असल्याचे वृत्त आहे. तर दोन एके-47 सोबतच तीन रायफल यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर शोध मोहिम हाती घेण्यात आली. दहरम्यान दहशतवाद्यांनी फायरींग सुरू केली. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांनी जम्मू-कश्मिरात शोध मोहिम हाती घेतली आहे. या महिन्यात जवळपास 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 

16 दिवसात 9 एन्काउंटर 
1 जून: नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना 3 पाकिस्तान दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले. 
2 जून: पुलवामाच्या त्राल परिसरात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
3 जून: पुलवामाच्या कंगन परिसरात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना ठार केले 

5 जून: राजौरी जिल्ह्याच्या कालाकोटमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान 7 जून: शोपियाच्या रेबन गावात 5 दहशतवादी मारले गेले  8 जून: शोपियांच्या पिंजोरा परिसरात 4 दहशतवादी ठार 

10 जून: शोपियांच्या सुगू परिसरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान  13 जून: कुलगामच्या निपोरा परिसरात 2 दहशतवादी मारले गेले  16 जून: शोपियाच्या तुर्कवंगम परिसरात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

Advertisement
0