आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल सातत्याने दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत. शनिवारी सकाळी सुरक्षा दलांना शोपियान जिल्ह्यात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. यावर सुरक्षा दलांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी टीमवर गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरात टीमने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्याचवेळी या चकमकीत दोन जवानही शहीद झाले. हे दोन्ही जवान राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते, त्यांची नावे संतोष यादव आणि रोमित चव्हाण अशी आहेत.
शहीद झालेले जवान हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील रहिवासी
राष्ट्रीय रायफल्सचे शहीद झालेले संतोष यादव हे उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी आहेत. दुसरीकडे, शिपाई रोमित थांजी चव्हाण हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. गोळी लागल्याने दोन्ही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराच्या पीआरओने दिली आहे.
काश्मीर पोलिसांनी ट्विट करून दिली ही माहिती
काश्मीर झोन पोलिसांनी आज सकाळी एका ट्विटमध्ये लिहिले की, लपून बसलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे, मात्र आणखी दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण टीम एकत्रितपणे अधिक तपास करत आहे. सध्या हे दहशतवादी कोणत्या गटाशी संबंधित आहेत याची ओळख पटलेली नाही.
जम्मू-काश्मीरात 2022 मधील हा तिसरा हल्ला
शुक्रवारी, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या नौहट्टा भागातील ख्वाजा बाजार येथे ग्रेनेड हल्ला केला, ज्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तर त्याआधी 30 जानेवारीला बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना ठार केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.