आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Security Forces Killed One Militant In Pulwama, Search For Two Continues; This Third Terrorist Incident In A Week

जम्मू-काश्मीरमध्ये एन्काउंटर:पुलवामामध्ये सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, दोघांचा शोध सुरू; एका आठवड्यात ही तिसरी दहशतवादी घटना

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या महिन्यात श्रीनगरमध्ये पोलिस पार्टीवर उघडपणे गोळीबार झाला होता

जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या काकापोरा भागात सुरक्षादल आणि अतिरेक्यांमधील चकमक सुरूच आहे. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. तर दोन जणांचा शोध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

वृत्तसंस्थेनुसार, सुरक्षदलाला काकापोराच्या सांबोरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावर सुरक्षा दलाला प्रत्युत्तर कारवाई करावी लागली.

सोपोर नगर परिषद कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता
यापूर्वी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील नगर परिषद कार्यालयावर अतिरेक्यांनी गोळीबार केला होता. हल्ल्याच्या वेळी नगरसेवकांची कार्यालयात मिटींग सुरू होती. गोळी लागल्याने नगरसेवक रियाझ अहमद यांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान नगरसेवक शम्सुद्दीन यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक पोलिस शफाकत अहमदही शहीद झाले होते.

4 पोलिसांना निलंबित करण्यात आले
काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी एसएसपी सोपोर यांना घटनास्थळी उपस्थित असलेल्या 4 पोलिसांना (PSO) निलंबित करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, हे चार पोलिस दहशतवाद्यांविरूद्ध योग्य रीतीने प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत.

गेल्या महिन्यात श्रीनगरमध्ये पोलिस पार्टीवर उघडपणे गोळीबार झाला होता
मागील महिन्याच्या सुरुवातीला श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याने पोलिस दलावर गोळीबार केला होता. यात 2 सैनिक शहीद झाले. बागत परिसरातील बारजुल्ला येथे ही घटना घडली होता. हा हल्ला दुकानावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...